Honda Cars: जपानी कार निर्माता (Japanese carmaker) देशात एक नवीन मोहीम सुरू करण्यासाठी सज्ज आहे. कंपनीतर्फे 21 सप्टेंबरपासून देशातील 239 शहरांमध्ये सर्विस कॅम्प (service camp) सुरू होणार असून ते 30 सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. या काळात तुम्ही तुमच्या कारमधील कोणतीही समस्या सोडवू शकता.
सर्विस कॅम्पमध्ये हे काम केले जाईल
कंपनीने आयोजित केलेल्या सर्विस कॅम्पमध्ये कारच्या एक्सटीरियर, इंटीरियर आणि अँटी-रस्ट ट्रीटमेंटवर चांगली डील मिळू शकते. याशिवाय कॅम्पमध्ये कार सर्व्हिस, बॅटरी चेकअप, इलेक्ट्रिकल सिस्टिम चेक, सस्पेंशन चेकसह अनेक पार्टस तपासले जाणार आहेत. तपासणी केल्यानंतर, कंपनीचे तंत्रज्ञ तुम्हाला कारच्या हेल्थची संपूर्ण माहिती देतील, ज्यामुळे तुम्हाला आगामी काळात कारमध्ये कोणत्या प्रकारचे काम करावे लागेल हे समजणे देखील सोपे होईल.
कंपनीसाठी ग्राहकांचे समाधान महत्त्वाचे
कंपनीचे विक्री उपाध्यक्ष कुणाल बहल म्हणाले की, होंडा कार्स इंडिया नेहमीच आपल्या सर्व ग्राहकांना सर्वोत्तम सेवा देण्याचा प्रयत्न करते. देशभरात सुरू होत असलेल्या मेगा सर्विस कॅम्पच्या माध्यमातून जास्तीत जास्त ग्राहकांना याचा लाभ मिळावा, असा आमचा प्रयत्न असेल. सर्विस कॅम्प दरम्यान ग्राहकांना ठराविक किमतीत वेळेवर मेंटेनेंस सर्विस मिळेल, तर दुरुस्तीसह इतर कामांवर ऑफर दिली जाईल.
सुविधा कुठे मिळेल
कंपनी 21 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर या कालावधीत देशभरातील 239 शहरांमध्ये मेगा सर्व्हिस कॅम्प आयोजित करणार आहे. या काळात कोणताही होंडा कार मालक आपली कार कंपनीच्या सर्विस सेन्टरमध्ये घेऊन सुविधेचा लाभ घेऊ शकतो.
कंपनीची भारतात अनेक मॉडेल्स आहेत ही कंपनी देशात 1995 पासून सुरू झाली. तेव्हापासून लाखो भारतीयांनी जपानी कंपनीच्या कार खरेदी केल्या आहेत. सध्या, होंडा भारतीय बाजारपेठेत Jazz, Amaze, WR-V, City सारखी मॉडेल्स विकते.