अहमदनगर Live24 टीम, 21 मे 2021 :- नगर तालुका पोलिसांनी सुरू असलेल्या हनी ट्रॅप प्रकरण उघडीस आणून पाच जणांना विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणात नगर तालुका पोलिसांनी एका ३० वर्षीय महिलेला आणि दोन तरुणांना अटक केली आहे.या प्रकरणात पत्रकार बाळ बोठे याला सह आरोपी करण्याची मागणी ॲड. सुरेश लगड यांनी जिल्ह्या पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडे एका निवेदनात केली आहे.
या निवेदनात सुरेश लगड यांनी म्हटले आहे कि नगर तालुक्यातील जखणगांव येथील हनी ट्रॅप करणारे टोळीचा आपल्या अधिपत्याखालील नगर तालुका पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री राजेंद्र सानप व त्यांचे सहकारी पोलीसांनी पर्दाफाश केल्यानंतर यात पोलीस तपासात निष्पन्न झालेल्यांचे अनेक गैरकृत्य समोर आलेले आहेत.
या गुन्हयाचा तपास करतांना नगर येथील बहुचर्चीत रेखा जरे हत्याकांडातील मुख्य सुत्रधार पत्रकार बाळ बोठे याने यापूर्वी ट्रॅप मालीका एका दैनिक वर्तमानपत्राचे अनेक भागात प्रसिध्द केलेली होती व त्या मालीकेत भरडल्या गेलेल्या अनेक व्यक्तींचे नावाचा अप्रत्यक्ष उल्लेख केलेला होता.
तर या बोठेचा आत्ताच्या जखणगांव येथील घडलेल्या हनी ट्रॅप प्रकरणाशी काही संबंध आहे का या अनुषंगाने पोलीसांनी अटक आरोपी कडुन फिर्यादी कडुन व साक्षीदाराकडुन खोलवर चौकशी करून तसेच
आरोपींचे फोन कॉल रेकॉर्ड गोळा करून त्यात या बाळ बोठेचा सहवास निष्पन्न झाल्यास पोलीसांनी त्या बाळ बोठेला सह आरोपी करावे अशी विनंती वजा मागणी मी आपणाकडे समाज हितार्थ करीत आहे.
एवढेच नव्हे तर दोनही हनी ट्रॅप प्रकरणात शिकार झालेल्यांनी न संकोचता पुढे येऊन अशा नालायक अपप्रवृत्ती विरुद्ध लेखी फिर्याद नोंदवावी अशीही माझी विनंती आहे.