सांगली : बारामतीचा (Baramati) गडी एवढा हुशार कसा? हे आपण मेल्यावर वर गेल्यावर ब्रह्मदेवाला विचारणार आहे, असे म्हणत शेतकरी मेळाव्यामधून आमदार सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासह महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.
भाजपा (Bjp) आमदार गोपीचंद पडळकर (BJP MLC Gopichand Padalkar) यांच्या विकास निधीतून आटपाडी तालुक्यात विविध विकास कामांचा शुभारंभ भाजपचे विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर (Praveen Darekar), माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला आहे.
तसेच माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत देखील उपस्थित होते. यावेळी बोलताना त्यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधत म्हणाले, नुकतंच ब्राह्मण समाजाने शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर शरद पवारांनी म्हटले होते, ब्राह्मण समाजाने कधी आरक्षण मागितले नाही आणि कुणाला आरक्षण देऊ नये.
पण पवार साहेबांनी ट्विट करून दुसऱ्यांच्या आरक्षणाला तुम्ही विरोध करू नका असे सांगितले. पण ब्राम्हण समाज ओरडून सांगत आहे, आम्ही असं म्हटलं नाही. म्हणून बारामतीचा गडी कसा आला, हे आपण मेल्यावर वर गेल्यावर ब्रह्मदेवाला विचारणार आहे.
पवारांमध्ये कोणते स्पेअर पार्ट कुठले घातले होते? एवढा हुशार माणूस झाला कसा ? मला वाटते की ब्रह्मदेवाला चुकवून खाली पळाला. त्यामुळे इतका बिलंदर माणूस राजकारणात कधीही मिळणार नाही असा खोचक टोलाही सदाभाऊ खोत यांनी लगावला आहे.
तसेच छावा संघटनेचे मोठे गौप्यस्फोट मी आणि गोपीचंद पडळकर पागल माणसं..क्रांती करायला पागल माणसं लागतात, शहाणी माणसे क्रांती करत नाहीत, शहाणी माणसे अभ्यास करतात. शहाणी माणसं तत्वज्ञान शिकवतात. पागल माणसं क्रांती करतात, असे ते यावेळी म्हणाले आहेत.