ताज्या बातम्या

RBI Rule : एक व्यक्ती किती बँक खाती उघडू शकते?; जाणून घ्या आरबीआयचा नियम

RBI Rule Bank Account Opening : बचत असो किंवा कोणताही व्यवहार असो, कुठेही बँक खाते आवश्यक असते. आजकाल, जवळजवळ प्रत्येकाचे बँक खाते आहे ज्यामध्ये त्यांना त्यांचे पैसे वाचवणे किंवा व्यवहार करणे आवडते. तर काही लोक बँक खात्याद्वारे सरकारी योजनांचा लाभ घेतात. अशा परिस्थितीत एका व्यक्तीची एक किंवा दोन बँक खाती असू शकतात.

असेही काही लोक आहेत ज्यांची दोनपेक्षा जास्त बँक खाती आहेत, मग तुमच्या मनात कधी प्रश्न येतो का की एखाद्या व्यक्तीची किती बँक खाती असू शकतात? किंवा बँक खाती उघडण्याबाबत भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) च्या नियमांमध्ये काय म्हटले आहे? आज आम्ही तुम्हाला आरबीआयचे असे काही नियम सांगणार आहोत, ज्यामध्ये बँक खात्याबद्दल देखील सांगितले आहे.

बँक खाती किती प्रकारची असतात?

-बचत खाते
-चालू खाते
-पगार खाते (शून्य शिल्लक खाते)
-पगार खाते
-संयुक्त खाते (बचत आणि चालू)

कोणते खाते कोणासाठी?

जर तुम्हाला तुमची दैनंदिन किंवा मासिक बचत करायची असेल तर तुम्ही यासाठी बचत खाते उघडू शकता. बचत खाते हे देशातील सर्वाधिक वापरले जाणारे प्राथमिक खाते आहे. बचत खात्यावर व्याज दिले जाते. वेगवेगळ्या बँकांकडून वेगवेगळ्या महिन्यांनुसार व्याजदरही दिले जातात. याशिवाय लोक व्यवसायासाठी चालू खात्यांचा वापर करतात. तर काही लोक पगारासाठी पगार खाते वापरतात.

बँक खात्यासाठी RBI चा नियम काय सांगतो?

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमांनुसार, एखाद्या व्यक्तीची भारतात कितीही खाती असू शकतात. यासाठी कोणतीही मर्यादा निश्चित केलेली नाही. तथापि, आपण उघडलेल्या सर्व बँक खात्यांकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे, अन्यथा बँकेकडून त्यावर शुल्क आकारले जातात, ज्यामुळे तुम्हाला पुढे जाऊन काही अडचणींना समोरे जावे लागू शकते. जर तुमचीही एकापेक्षा जात खाती असतील आणि ती काही कामाची नसतील तर ती आजच बंद करा, अन्यथा भविष्यात तुम्हाला आर्थिक नुकसान होऊ शकते.

Renuka Pawar

Published by
Renuka Pawar

Recent Posts