अहमदनगर Live24 टीम, 31 मे 2021 :- पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थळ चोंडीच्या विकासासाठी आपण प्रयत्नशील आहोत, असे आमदार रोहित पवार यांनी रविवारी जयंतीच्या पार्श्वभूमीवर सांगितले.
अहिल्यादेवींच्या जयंतीनिमित्त आमदार पवार यांनी चोंडीला भेट दिली. पर्यटक वर्षभर येथे आले पाहिजेत, अहिल्यादेवींचे विचार घेऊन गेले पाहिजेत.
गावातील लोकांचे अर्थकारणही चालले पाहिजे. त्या दृष्टिकोनातून प्रयत्न केला जाणार आहे, असे त्यांनी सांगितले.
कुटुंबातील प्रमुख व्यक्तीचे कोरोनाने निधन झाल्यामुळे निराधार झालेल्या ५५ महिलांच्या कुटुंबांचा रोजगाराचा प्रश्न आमदार पवार यांच्या संकल्पनेतून राबवण्यात येणाऱ्या ‘आधार’ उपक्रमाद्वारे सोडवला जाणार आहे.
माजी मंत्री राम शिंदे कोरोनाकाळात किती वेळा जामखेडला आले? आम्ही लोकांना आधार देण्याचे काम केले. त्यामुळे जनतेला माहीत आहे की, कोण राजकारण करते? वेळ आल्यावर उत्तर देऊ, असे आमदार रोहित पवार म्हणाले.