किती हुश्शार होता बोठे ? हॉटेल मध्ये राहिला आणि नाव लिहिले…

अहमदनगर Live24 टीम, 13 मार्च 2021:-  अहमदनगर शहरांमधील बहुचर्चित यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ बोठे याला अहमदनगर पोलिसांनी हैदराबाद मधून अटक केली आहे.

गेल्या पाच दिवसांपासून सहा पथके बाळ बोठेच्या मागावर होते. बोठे याने तीन वेळा पोलिसांना चकवा दिला होता. अखेर आज पहाटे पोलिसांनी त्याला हाॅटेलमध्ये पकडले. हाॅटेलच्या रुमला बाहेरून कुलूप लावून बोठे आत लपला होता.

बाळ बोठे हा मागच्या तीन महिन्यापासून फरार होता.पोलिसांना ओळख पटू नये म्हणून बाळ बोठेने आपला चेहरामोहरा बदलला होता .

सुटा बुटा मध्ये राहणारा बाळ बोठे याला अटक केली त्यावेळेस पोलीसही चक्रावून गेले होती हाच तो बोठे आहे का ? हैदराबाद मधील हॉटेलमध्ये रजिस्टर बुक मध्ये त्याने बी .डी .पाटील या नावाने नोंद केली असल्याची माहिती आता समोर आली आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts