2025 मध्ये कसा राहील भारतात आणि महाराष्ट्रातील एकूण पाऊस? काय म्हणतो जागतिक हवामान विभाग? जाणून घ्या माहिती

Maharashtra Rain Predict 2025:- 2024 या हंगामातील जर आपण संपूर्ण भारतातील पाऊल बघितला तर तो समाधानकारक राहिला व महाराष्ट्रातील पाऊसमान देखील खूप चांगल्या पद्धतीचे राहिल्याने यावर्षी महाराष्ट्रातील शेती आणि पिण्याच्या पाण्याची समस्या सगळीकडे आपल्याला सुटल्याचे दिसून येत आहे.

जवळपास संपूर्ण भारतात आणि महाराष्ट्रात सरासरीपेक्षा किंवा सरासरी इतका पाऊस झाल्याचे चित्र राहिले. परंतु आता 2025 या नवीन वर्षाचे आगमन होणार असून साहजिकच 2025 या वर्षांमध्ये पावसाळा कसा राहील? अशा पद्धतीचा प्रश्न देखील अनेक जणांच्या मनात येतो.

आपल्याला माहित आहे की जगभरातील पावसाच्या परिस्थितीवर ला निना आणि अल निनो सारख्या वातावरणाच्या परिस्थितीचा परिणाम हा काही ठराविक वर्षानंतर पाहायला मिळतो.

या दोन्ही हवामानाशी संबंधित ज्या काही संकल्पना आहेत या प्रशांत महासागराची संबंधित आहेत व त्याचा चांगला किंवा वाईट परिणाम हा संपूर्ण मान्सूनवर होत असतो व त्याचा फटका संपूर्ण जगाला बसतो.

जर आपण जागतिक हवामान विभागाच्या दिलेल्या माहितीनुसार बघितले तर सध्या संपूर्ण जगामध्ये वातावरण सामान्य असून पुढच्या वर्षी जानेवारी ते फेब्रुवारी या कालावधीमध्ये ला निनाकरिता अनुकूल वातावरण तयार होत असल्यामुळे ला नीना सक्रिय होण्याची शक्यता जवळपास 55% पेक्षा अधिक आहे. त्यामुळे जगाच्या काही भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर उष्णता तर काही भागात पाऊस व कडाक्याची थंडी जाणवू शकते.

जागतिक हवामान विभागाने काय दिली आहे माहिती?
जागतिक हवामान विभागाकडे दिलेल्या माहितीनुसार बघितले तर संपूर्ण भारत व जगभरात वातावरण सध्या सामान्य असून येणाऱ्या वर्षातील जानेवारी व फेब्रुवारी या कालावधीत जगभरामध्ये ला निनाकरिता अनुकूल वातावरण तयार होत असल्याने तो सक्रिय होण्याची शक्यता 55% पेक्षा जास्त आहे. ला नीनाचा परिणाम हा जगाच्या दक्षिण भागात आणि उत्तर भागात वेगवेगळ्या दिसून येतो.

अशा परिस्थितीमध्ये जर ला नीना सक्रिय झाला तर दक्षिण गोलार्धामध्ये मोठ्या प्रमाणावर उष्णता वाढते व उत्तर गोलार्धात मात्र मोठ्या प्रमाणावर थंडी जाणवायला लागते. भारतीय उपखंडाचा विचार केला तर या ठिकाणी ला निनाचा परिणाम हा उष्णतेसोबतच मान्सूनच्या पावसावर देखील होतो.

जागतिक हवामान विभागाचा वर्तवलेला अंदाज बघितला तर त्यानुसार जानेवारी ते फेब्रुवारी या कालावधीत जर ला निना सक्रिय झाला तर भारतामध्ये येणाऱ्या वर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

परंतु या उलट जेव्हा अल निनोचा प्रभाव जर असला तर काय परिस्थिती होते हे आपण अनुभवले आहे. यामुळे मान्सून करिता प्रतिकुल वातावरण तयार होते व सरासरीपेक्षा कमी पाऊस पडतो व त्यामुळे दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण होते.

परंतु जागतिक हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे की येणाऱ्या वर्षी जगासह भारतात ला निनाचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे व त्यामुळे पावसाचे प्रमाण चांगले राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे व काही भागात अतिवृष्टी होऊ शकते अशी देखील शक्यता वर्तवली आहे.

महाराष्ट्रात कशी राहील परिस्थिती?
महाराष्ट्रमध्ये आपण बघितले तर मागच्या वर्षी बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टी झाली व शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. परत आता या येणाऱ्या वर्षात जर ला निनाचा प्रभाव राहिला तर महाराष्ट्रात देखील सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडून पुन्हा एकदा अतिवृष्टी सारख्या संकटाचा सामना शेतकऱ्यांना व एकंदरीत सगळ्यांना करावा लागू शकतो.

परंतु या सगळ्या स्थितीत मान्सूनसाठी सामान्य स्थिती राहिली तर येणाऱ्या वर्षी देखील महाराष्ट्र मध्ये चांगला आणि सामान्य पाऊस पडेल अशी एक शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts