Hyundai Car : ह्युंदाईच्या अनेक कार मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. त्यापैकी Creta ही कंपनीची सर्वात शक्तिशाली कारपैकी एक आहे. या कारची विक्री मोठ्या प्रमाणात झाली आहे. कंपनीने यात आपल्या ग्राहकांसाठी जबरदस्त फीचर्स देण्यात आली आहेत.
इतकेच नाही यात सेफ्टी फीचर्सही दिली आहेत. कंपनीची ही कार मार्केटमधील इतर कंपन्यांच्या कार्सना कडवी टक्कर देत आहे. या कारचे टॉप मॉडेल खरेदी करण्यासाठी तुम्हाला 19.20 लाख रुपये मोजावे लागणार आहेत. परंतु जर तुम्हाला ही कार खरेदी करायची असेल तर ती तुम्ही स्वस्तात खरेदी करू शकता.
कारची किंमत?
कंपनीकडून या कारची प्रारंभिक एक्स-शोरूम किंमत सुमारे 10.87 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. त्याच वेळी, त्याचे टॉप मॉडेल खरेदी करण्यासाठी, तुम्हाला 19.20 लाख रुपये खर्च करावे लागणार आहेत. परंतु या कारवर आतापर्यंतची सर्वात मोठी ऑफर देण्यात येत आहे. त्यामुळे तुमची हजारो रुपयांची बचत होईल.
काय आहे ऑफर
माहितीनुसार, 2015 Hyundai Creta 1.6 या ठिकाणी विक्रीसाठी 7,65,000 रुपयांना लिस्ट करण्यात आली आहे. कंपनीच्या या कारने 54 हजार किलोमीटरपेक्षा जास्त अंतर चालवले असून ही डिझेल इंजिन कार आहे. जर तुम्हाला ही कार विकत घ्यायची असेल तर तुम्हाला ती दिल्ली येथे विक्रीसाठी उपलब्ध आहे.
इतकेच नाही तर आणखी एक 2015 Hyundai Creta 1.6 विक्रीसाठी उपलब्ध असून ही कार 28025 किलोमीटरपर्यंत धावली आहे. ही कार पेट्रोल इंजिनमध्ये उपलब्ध आहे. या कारसाठी रु.7,91,000 ची विचारणा किंमत ठेवली आहे. ही कार देखील दिल्ली येथे विक्रीसाठी उपलब्ध आहे.