Hyundai Car Offer : बाजारात अनेक कंपन्यांच्या कार्स उपलब्ध आहेत. तुम्ही तुमच्या बजेटनुसार कोणतीही कार खरेदी करू शकता. मागील काही दिवसांपासून इंधनाच्या किमतीत झपाट्याने वाढ झाली आहे. त्यामुळे आता ग्राहक कार खरेदी करताना तिचे मायलेज पाहतात. जास्त मायलेज देणाऱ्या कार खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल वाढला आहे.
परंतु आता जवळपास सर्वच कार निर्मात्या कंपन्यांनी त्यांच्या कारच्या किमतीत कमालीची वाढ केली आहे. त्यामुळे ग्राहकांना या कार जास्त पैसे देऊन खरेदी कराव्या लागत आहेत. परंतु आता तुम्ही खूप स्वस्त कार खरेदी करू शकता.
भारतीय बाजारपेठेत ह्युंदाईच्या कारला चांगलीच मागणी आहे. सध्या ह्युंदाईची ऑरा सीएनजी बाजारात मारुती सुझुकीच्या डिझायर सीएनजीला कडवी टक्कर देत आहे. आता तुम्ही ही कार मूळ किमतीपेक्षा खूप कमी किमतीत खरेदी करू शकता. देशभरातील काही डीलर्स ऑक्टोबर 2023 मध्ये Hyundai कारवर अनेक उत्पादनांवर मोठ्या प्रमाणात सूट देत आहेत.
जाणून घ्या खास ऑफर
आता Hyundai Aura सब-फोर-मीटर सेडानच्या CNG अवतारवर तब्बल 20,000 रुपयांची रोख सवलत मिळत आहे. परंतु ही ऑफर इथेच संपली नाही. तर या कारच्या खरेदीवर 10,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 3,000 रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काउंट देखील उपलब्ध आहे. तर दुसरीकडे, पेट्रोल व्हेरिएंटवर 10,000 रुपयांची रोख सवलत आणि 3,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस देखील उपलब्ध करून दिला आहे.
किमतीत झाली वाढ
हे लक्षात घ्या की या महिन्याच्या सुरूवातीला Hyundai ने Aura च्या किमती 11,200 रुपयांनी वाढल्या आहेत, जी बेस-स्पेक ई प्रकारावर लागू होणारी सर्वात जास्त वाढ आहे. इतकेच नाही तर SX(O) प्रकाराच्या किंमतीत कोणताही बदल झाला नाही, परंतु इतर सर्व प्रकारांमध्ये 9,900 रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. त्यामुळे तुम्हाला ही कार खरेदी करण्यासाठी जास्त पैसे मोजावे लागतील.