Hyundai Diwali Offers : देशात सध्या सणासुदीचे दिवस सुरु झाले आहेत. दिवाळी (Diwali) काही दिवस राहिली आहे. या दिवाळीच्या शुभमुहूर्तावर अनेक ठिकाणी ऑफर्स (Offers) लागल्या आहेत. तसेच ऑटोमोबाईल (Automobile) क्षेत्रामध्येही गाड्यांवर बंपर सूट दिली जात आहे.
Hyundai India ने सध्याच्या सणासुदीच्या हंगामासाठी निवडक मॉडेल्सवर खास दिवाळी ऑफर आणली आहे. या दिवाळीत Hyundai Aura, Grand i20 Nios, i20 आणि Kona इलेक्ट्रिक कार खरेदीवर तुम्ही कमाल 1 लाख रुपयांपर्यंत सूट मिळवू शकता.
दक्षिण कोरियाची ऑटो कंपनी 1 लाख रुपयांपर्यंतची सूट ऑफर देत आहे, ज्यामध्ये रोख सवलत आणि एक्सचेंज ऑफरचा समावेश आहे. लक्षात ठेवा ही ऑफर केवळ 31 ऑक्टोबरपर्यंत वैध असेल.
ही ऑफर भारतातील कोणत्याही Hyundai अधिकृत डीलरशिपवरून घेता येईल. तुम्ही येथे चारही कारवर उपलब्ध असलेल्या सवलतीच्या ऑफर पाहू शकता.
Hyundai Aura (रु. 30,000)
Hyundai Aura च्या पेट्रोल व्हेरियंटवर 5,000 रुपयांपर्यंत सूट मिळत आहे, तर CNG मॉडेलवर 20,000 रुपयांपर्यंतचे फायदे मिळतील. ऑक्टोबरमध्ये हॅचबॅक कार खरेदी केल्यावर, ही सवलत 10,000 रुपयांपर्यंत रोख आणि एक्सचेंज बोनसच्या स्वरूपात उपलब्ध असेल. याशिवाय सरकारी आणि कॉर्पोरेट कर्मचार्यांना 3,000 रुपयांची वेगळी सूट मिळत आहे.
Hyundai Grand i10 Nios (रु. 48,000)
Grand i10 Nios ला पेट्रोल आणि CNG दोन्ही मॉडेल्सवर 48,000 रुपयांपर्यंत सूट मिळत आहे. i10 च्या खरेदीवर कंपनी 35,000 रुपयांपर्यंत रोख सूट देत आहे. याशिवाय 10,000 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर देखील समाविष्ट आहे. त्याच वेळी, सरकारी आणि कॉर्पोरेट कर्मचार्यांना 3,000 रुपयांपर्यंतची स्वतंत्र सूट मिळत आहे.
Hyundai Kona Electric (रु. 1,00,000)
दिवाळीत सर्वात मोठी सूट Hyundai च्या इलेक्ट्रिक कारवर मिळत आहे. या दिवाळीत तुम्ही Kona इलेक्ट्रिक खरेदी केल्यास तुम्हाला 1 लाख रुपयांपर्यंतचा फायदा मिळेल.
भारतीय ग्राहकांना रोख ऑफरच्या स्वरूपात 1 लाख रुपयांपर्यंतचे फायदे मिळत आहेत. कोना इलेक्ट्रिकवर कोणतेही एक्सचेंज बोनस किंवा कॉर्पोरेट फायदे उपलब्ध होणार नाहीत.