ताज्या बातम्या

Hyundai Exter : टाटा पंचला टक्कर देणार नवीन ह्युंदाई एसयूव्ही, कमी किमतीत मिळणार हटके फीचर्स

Hyundai Exter : ह्युंदाईच्या आगामी एसयूव्हीचे चाहते अनेक दिवसांपासून आतुरतेने वाट पाहत होते. अशातच आता बहुप्रतिक्षित एसयूव्हीचे अनावरण या कंपनीकडून करण्यात आले आहे. अनेक दिवसांपासून या कारची चर्चा सुरु होती.

तसेच कंपनीही या कारवर बऱ्याच काळापासून काम करत होती. कंपनी लवकरच SUV Exter लाँच करणार आहे. या कारमध्ये जबरदस्त पॉवरट्रेन पाहायला मिळणार आहे. त्यामुळे लाँच झाल्यानंतर ही एसयूव्ही टाटा पंचला कडवी टक्कर देऊ शकते. या कारमध्ये कोणते फीचर्स आणि कारची किंमत किती असणार ते जाणून घ्या.

जाणून घ्या ह्युंदाईचे नवीन फीचर्स

ह्युंदाई आपल्या नवीन कारमध्ये अनेक शानदार फीचर्स देऊ शकते. कंपनी आगामी कारमध्ये सनरूफ, एलईडी डीआरएल, प्रोजेक्टर एच शेप हेडलॅम्प, 17 इंच अलॉय व्हील यांसारखे अनेक शानदार फीचर्स देणार आहे. इतकेच नाही तर या कारमध्ये डिजिटल एमआयडी, स्टीयरिंगवरील नियंत्रणे आणि सुरक्षिततेसाठी अनेक फीचर्स आतील भागात आढळू शकतात.

जाणून घ्या किंमत

किमतीबाबत विचार केला तर या कंपनीने अजूनही कारच्या किमती अधिकृतपणे जाहीर केल्या नाहीत. परंतु असा अंदाज वर्तवण्यात येत आहे की कंपनी 10 लाख रुपयांपर्यंतच्या सुरुवातीच्या एक्स-शोरूम किंमतीला भारतीय बाजारात लॉन्च करेल.

त्यामुळे जर तुम्ही एक उत्तम कार घेण्याचा विचारात असल्यास ही आगामी Hyundai कार तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरेल. या कारच्या लॉन्चसोबतच कंपनीशी निगडित बँक एक जबरदस्त फायनान्स प्लॅनही देईल. तसेच या कारचा लूक खूप क्यूट आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts