Hyundai Electric Car : भारतीय बाजारात इलेक्ट्रिक कारची मागणी झपाट्याने वाढली आहे. इंधनाच्या किमती जास्त झाल्यामुळे ग्राहक इलेक्ट्रिक कारकडे वळाले आहेत. अनेक दिग्ग्ज कार उत्पादक कंपन्या आपल्या नवनवीन कार्स शानदार फीचर्ससह लाँच करत आहेत.
अशातच आता Hyundai ही कार उत्पादक कंपनीही आपली नवीन कार लाँच करण्याच्या तयारीत आहे. लवकरच ह्युंदाई कोना इलेक्ट्रिक लाँच होणार आहे. सिंगल चार्जवर ही कार 490 किमी पर्यंतची रेंज देईल असा दावा कंपनीने केला आहे. या कारबद्दल जाणून घ्या सावितर.
लाँच होणार ह्युंदाई कोना इलेक्ट्रिक
Hyundai कडून काही दिवसांपूर्वी Kona EV 2023 चे फोटो दाखवण्यात आले आहेत. नवीन कोना इलेक्ट्रिक 0.27 ड्रॅग गुणांकासह पूर्णपणे नवीन डिझाइनमध्ये येत आहे. बाह्य डिझाइन घटकांमध्ये कनेक्टेड एलईडी लाइट बार, स्प्लिट एलईडी हेडलाइट्स आणि कनेक्ट केलेल्या एलईडी रियर लाईट बारसह स्प्लिट एलईडी टेल लाइट्स यांचा समावेश असणार आहे.
कसे असणार इंटीरियर आणि फीचर्स
कारच्या आतील बाजूस, इलेक्ट्रिक SUV ला एक नवीन डॅशबोर्ड लेआउट मिळणार आहे. यात 12.3-इंच कनेक्टेड स्क्रीन असून मल्टीमीडिया आणि क्लायमेट कंट्रोलसाठी कनेक्टेड एसी व्हेंट्स आणि फिजिकल बटणे मिळतात. इतर फीचर्समध्ये हेड-अप डिस्प्ले, अडॅप्टिव्ह रीजनरेटिव्ह ब्रेकिंग, प्रगत ड्रायव्हर असिस्टंट सिस्टम (ADAS) आणि वाहन टू लोड (V2L) चार्जिंग यांचा समावेश असणार आहे.
कसे आहे पॉवरट्रेन डिटेल्स
या कारमध्ये 2 बॅटरी पॅक पर्याय देण्यात येऊ शकतात. पहिली 48.4kWh बॅटरीसह साधी श्रेणी आणि 65.4kWh बॅटरीसह लांब श्रेणी मिळेल, लाँग रेंज मॉडेल 217PS पॉवर आणि 255Nm टॉर्कसह येऊ शकते. कंपनीची आगामी कार एका चार्जवर 490 किमी पर्यंतची रेंज देईल. कोना इलेक्ट्रिकचे मानक श्रेणी आणि लांब पल्ल्याची दोन्ही मॉडेल्स 2WD ड्राइव्हट्रेनसह येतात. डीसी फास्ट चार्जरसह, नवीन कोना इलेक्ट्रिक 41 मिनिटांत 10 ते 80 टक्के चार्ज होईल.
काय आहे लाँच तारीख आणि किंमत
सध्याच्या कोना इलेक्ट्रिकची किंमत सुमारे 24 लाख रुपये इतकी आहे. नवीन अवतारात किमतीत थोडी वाढ होण्याची शक्यता आहे. 2024 च्या सुरुवातीला Hyundai नवीन Kona इलेक्ट्रिक कार लाँच होऊ शकते. यावर्षी, कंपनीने Ioniq 5 इलेक्ट्रिक क्रॉसओवर 2023 ऑटो एक्सपोमध्ये 44.95 लाख रुपयांच्या किमतीत लॉन्च केली आहे.