Hyundai : Hyundai 6 सप्टेंबर रोजी कॉम्पॅक्ट SUV व्हेन्यूचा (compact SUV Venue) N-लाइन वेरिएंट (N-line variant) लॉन्च करणार आहे. ही सध्याच्या मॉडेलपेक्षा वेगळी असणार आहे.
त्याचे इंटीरियर देखील अधिक प्रीमियम असेल. असे मानले जाते की त्याच्या DCT आणि iMT वर्जनमध्ये 1.0 टर्बो पेट्रोल इंजिन असेल.
तसेच स्टैंडर्ड वेन्यूमध्ये 1.2L पेट्रोल आणि 1.5L डिझेल इंजिन पर्यायांसह ऑफर केले जाईल. यापूर्वी कंपनीने i20 चे N-line मॉडेल लाँच केले आहे. N-Line कोणत्याही Hyundai कारचे प्रीमियम वेरिएंट आहे.
Hyundai N-Line व्हेन्यूचे अपेक्षित स्पेसिफिकेशंस
एन-लाइन वेन्यूचे इंटीरियर अधिक प्रीमियम असतील. कंपनीने त्याच्या इंटीरियरमध्ये नवीन एलीमेंट जोडले आहेत. सीटिंग सध्याच्या मॉडेलप्रमाणे असू शकते, परंतु कंपनी त्याचा डॅशबोर्ड बदलेल, स्टिअरिंगला स्पोर्टी लुक देईल. कंपनीला एन-लाइन वेरिएंटसह यूजर्सचा अनुभव सुधारायचा आहे. यूजर्सला स्पोर्टी लुकचा अनुभव मिळायला पाहिजे तसेच कंपनीने त्याच्या सस्पेंसनवरही काम केले आहे.
N-Line Venue मध्ये वायरलेस Apple CarPlay आणि Android Auto सह 8.0-इंच टचस्क्रीन, लिंक्ड कार टेक्नोलॉजी, एक मोटर अॅक्टिव्ह ड्रायव्हर सीट, LED प्रोजेक्टर आणि कॉर्नरिंग हेडलाइट्स, उच्च N8 ट्रिममध्ये बोस साउंड सिस्टम समाविष्ट असू शकते.
कारच्या आतील भागात लाल आणि काळ्या रंगाचे कॉम्बिनेशन पाहायला मिळते. Hyundai Venue N-Line ला 1.0-लिटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल युनिट मिळण्याची अपेक्षा आहे जे 120 हॉर्सपावर आणि 172 lb-ft टॉर्क बनवते.हे 6-स्पीड IMT किंवा 7-स्पीड DCT शी जोडलेले आहे.
Hyundai N-Line सीरीजवर जास्त फोकस
Hyundai N-Line सीरीजवर अधिक फोकस करत आहे. या रेंजमध्ये त्याच्या समोर कमी कॉम्पटीटिर आहेत. i20 N-Line मध्ये आता पर्यंत लोकांनी जास्त रस दाखवला आहे.
कंपनी सध्याच्या मॉडेलपेक्षा व्हेन्यू एन-लाइनला अधिक पुश करणार आहे. त्याच्या एन-लाइन कारचे मॉडेल वेगाने वाढत आहे. Hyundai Venue N-Line ची किंमत नियमित मॉडेलपेक्षा 1 लाख ते 1.5 लाख रुपये जास्त असू शकते.