ताज्या बातम्या

‘शरद पवारांनी पाठिंबा दिला तर मी राष्ट्रपती होऊ शकतो’

मुंबई : सध्या महाराष्ट्रातील (Maharashatra) राजकारणात अभिजीत बिचुकले (Abhijit Bichukale) हे नाव पुन्हा चर्चेत येऊ लागले आहे. कारण त्यांनी थेट राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी (election of the President) मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत.

याबाबत माध्यमांशी बोलताना बिचकुले यांनी राष्ट्रवादीचे (Ncp) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याविषयी महत्वपूर्ण विधान केले आहे. “राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठीअध्यक्ष शरद पवारांनी पाठिंबा दिला तर आपलं काम सोपं होईल”, असे बिचुकले म्हणाले आहेत.

पवारांनी पाठिंबा द्यावा- बिचुकले

“राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठीअध्यक्ष शरद पवारांनी पाठिंबा दिला तर आपलं काम सोपं होईल. पवारांचं आमदार ऐकतात. मला आमदारांच्या सह्या मिळतील आणि माझा राष्ट्रपती होण्याचा मार्ग सोपा होईल. मी राष्ट्पती होऊ शकतो”, असे बिचुकले म्हणाले आहेत.

तसेच महाविकास आघाडीमध्ये (Mahavikas Aghadi) चाललेल्या राजकीय रस्सीखेचविषयी विचारलं असता ते म्हणाले की, “सध्या महागाई वाढतेय. त्यावर कुणीही बोलत नाही. याची प्रॉपर्टी किती त्याची प्रॉपर्टी किती यावरून तुम्ही भांडत आहात हे बरोबर नाही. जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष द्या.”

दरम्यान, बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवणार आहेत. त्यांनी तशी घोषणा केली आहे. त्यासाठी ते ठरवून दिलेल्या आमदार खासदारांचा पाठिंबा मिळवण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत आणि लवकरच अर्ज देखील दाखल करणार आहेत.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts