अहमदनगर Live24 टीम, 17 जानेवारी 2022 :- काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ‘मी मोदींना मारू शकतो, शिव्या देऊ शकतो’ असे विधान केले आहे. भंडाऱ्याच्या प्रचारसभेनंतर नाना पटोले यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले आहे.
त्यामुळे राजकारण पेटण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात रविवारी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूक प्रचार करण्याचा शेवटचा दिवस होता. पटोले हे भाजप आणि विरोधकांवर अनेकदा थेट टीका करतात.
पण आता पटोले यांचा एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मारण्याची आणि शिव्या देण्याची भाषा करत असल्याचे पाहायला मिळत आहे.
आक्षेपार्ह आणि वादग्रस्त वक्तव्य नाना पटोले यांनी केलेल्या विडिओ मध्ये त्यांनी म्हंटले आहे की, मी का भांडतो? मी आता मागील 30 वर्षापासून राजकारणात आहे.
लोकं पाच वर्षात आपल्या एका पिढीचा उद्धार करुन टाकतात. शाळा, कॉलेज हे करुन आपल्या एक-दोन पिढीचा उद्धार करुन टाकतात. मी एवढ्या वर्षाच्या राजकारणात एक शाळा नाही घेतली.
एक ठेकेदारी नाही केली. जो आला त्याला मदत करतो. म्हणून मी मोदींना मारु शकतो, त्यांना शिव्या देऊ शकतो आणि म्हणून मोदी माझ्या विरोधात प्रचाराला आले. एक प्रमाणिक नेतृत्व तुमच्या इथे आहे, असे ते विडिओ मध्ये म्हणाले आहे.
लोकसभेची निवडणूक हरल्यानंतर नाना पटोले हे ऑक्टोबर २०१९ मध्ये साकोली विधानसभा क्षेत्रातून निवडणूक रिंगणात उतरले होते.
त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे परिणय फुके यांच्या प्रचारासाठी साकोली येथे आले होते. याच गोष्टीचा राग धरून नाना पटोले हे वारंवार मोदींवर वक्तव्य करीत आहे.
रविवारी सायंकाळी लाखनी तालुक्यातील जेवनाळा येथे प्रचार सभेत काही नागरिकांनी आपल्या समस्या मांडल्या आहे. दरम्यान, भाजपकडूनही पटोले यांच्या या व्हिडीओवर जोरदार हल्ला चढवण्यात आला आहे.