मुंबई : भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आणि शिवसेना (Shivsena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यामध्ये आरोप सत्र सुरु आहे. किरीट सोमय्या यांनी आता पुन्हा एकदा एक इशारा दिला आहे. ठाकरे सरकारचा (Thackeray Government) आणखी एक घोटाळा बाहेर काढणार असल्याचा इशारा दिला आहे.
संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांच्यावर INS विक्रांत (INS Vikrant) वाचवण्यासाठी जो निधी गोळा केला होता त्यामध्ये नील सोमय्या आणि किरीट सोमय्या यांनी घोटाळा केल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
किरीट सोमय्या यांच्यावर आरोप झाल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर किरीट सोमय्या हे गायब झाले होते. मात्र कोर्टाने त्यांचा अटकपूर्व जामीन मंजूर केल्यानंतर ते पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.
सोमय्या माध्यमांशी बोलताना म्हणाले, ठाकरे सरकारमधील एक डझन लोकांची प्रॉपर्टी अटॅच झालीय. अनिल देशमुख, श्रीधर पाटणकर, नवाब मलिकांसह त्यांची प्रॉपर्टी जप्त झाली आहे.
संजय राऊत, यशवंत जाधव, अजित पवार, हसन मुश्रीफ, सदानंद कदम, आनंदराव अडसूळ आणि इतरांची प्रॉपर्टीही अटॅच झाल्याचं सोमय्या माहणाले. नियमाप्रमाणे मी किंवा वकील कोर्टात जाऊ शकतो.
आम्ही कोर्टात सगळी माहिती देत आहोत. 1997-98 पासून विक्रांतही मोहीम सुरु होती. विक्रांतचा कार्यक्रम सिम्बॉलिक होता. विक्रांत वाचवण्यासाठी शिवसेनेनं समर्थन दिलं होतं.
1997 पासून सुरुवात केलीय. संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांच्या सांगण्यावरुनच माझ्यावर आरोप केले. रात्री एक वाजता माझ्यावर गुन्हा दाखल झाला, याला सेटिंग म्हणातात अशी खोचक टीका त्यांनी केली आहे.
त्याचबरोबर ‘मुंबई महाराष्ट्राचा अभिमान आहे. त्यामुळे मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळं करण्याचा प्रश्नच येत नाही. मुंबई केंद्रशासित होणार नाही, ही स्टंटबाजी करुन संजय राऊत उद्धव ठाकरेंच्या म्हणण्यावरुन घोटाळ्यांवर पडदा टाकण्याचा प्रयत्न करत आहे असेही सोमय्या म्हणाले आहेत.
पाच घोटाळे काढले, त्याचा पाठपुरावा करण्यासाठी मी नॉट रिचेबल झालो. त्याचा खुलासा लवकरच करणार आहे. उद्धव ठाकरे यांची स्ट्रॅटेजी आहे. आम्ही दमडीचाही घोटाळा केला नाही.
काही करा पण एफआयआर करा, असा आदेश उद्धव ठाकरेंनी पोलिसांना दिलाय. ठाकरे साहेब आता तुम्ही मेधा सोमय्यांच्या मागे लागलात. पण काही सापडणार नाही, आम्ही घाबरत नाही.
58 कोटीचा आकडा अचानक संजय राऊतांच्या डोक्यात कसा आला? संजय राऊतांकडे कोणताही पुरावा नाही. मी सोमवारी पोलिसांसमोर जाणार आणि विचारणार की तुम्हाला काय विचारायचं ते विचारा. असेही सोमय्या यांनी खडसावून सांगितले आहे.