ताज्या बातम्या

एका खात्याचा चेक बाऊन्स झाला तर, दुसऱ्या खात्यातून…

Check bounce:चेक बाऊन्स प्रकरणी कितीही नियम आणि कायदे केले तरी हे प्रकार कमी होत नाही. उलट यंत्रणांवर त्याचा ताणच येत आहे. त्यामुळे या नियमांत आणखी काही सुधारणा करण्याचा विचार सरकार करीत आहेत.

यामध्ये एका खात्याचा चेक बाऊन्स झाला तर त्याच व्यक्तीच्या दुसऱ्या खातून पैसे काढून चेक वठविण्याची तरतूद करण्यात येणार आहे. इंडस्ट्री बॉडी पीएचडी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीने अलीकडेच वित्त मंत्रालयाला विनंती केली होती.

त्यानुसार संबंधितांकडून याविषयी सूचना मागविण्यात आल्या होत्या. यासंबंधी विविध सूचना प्राप्त झाल्या असून त्यावर आता विचार सुरू आहे. त्यातील योग्य सूचना स्वीकारून लवकरच नवी नियमावली करण्यात येणार आहे.

चेक बाऊन्स झाल्यास काही दिवसांसाठी बँकेतून पैसे काढण्यावर बंधन आणणे, चेक जारी करणाऱ्याच्या खात्यात पुरेसे पैसे नसल्यास, त्याच्या इतर खात्यातून रक्कम वजा करणे,

संबंधिताला नवीन खाती उघडण्यावरही बंदी घालणे, क बाऊन्सची प्रकरणं कर्ज डिफॉल्ट म्हणून हाताळणे, चेक जारी करणाऱ्याचा क्रेडिट स्कोअर कमी करणे अशा अनेक सूचना आल्या आहेत.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office
Tags: Check bounce

Recent Posts