ताज्या बातम्या

धरलं तर चावतंय, सोडलं तर पळतंय, काँग्रेसला प्रतिमा सुधारायची असेल तर आघाडीतून बाहेर पडावे: आमदार विखे

अहमदनगर Live24 टीम, 26 फेब्रुवारी 2022 :-  लोणी येथे प्रसार माध्यमांशी बोलताना विखे पाटील यांनी विविध विषयांवर भाष्य केले आहे. यामध्ये महाविकास आघाडी सरकारमध्ये सहभागी असलेल्या काँग्रेसच्या मंत्र्यांवर भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी जोरदार टीका केली आहे.

भ्रष्टाचाराच्या विळख्यात अडकल्यानं हातात बेड्या पडू नयेत, म्हणूनच काँग्रेसचे नेते महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्रिपदाला चिकटून राहिले आहेत, असा टोला विखे पाटील यांनी लगावला आहे.

आघाडी सरकारमधील काँग्रेसच्‍या सहा मंत्र्यांच्‍या खात्‍यांमध्‍ये होत असलेल्‍या संभाव्‍य बदल्यांच्‍या चर्चेवर भाष्‍य करताना आमदार विखे म्हणाले की, ‘काँग्रेसला आपली प्रतिमा सुधारायची असेल तर आघाडी सरकारमधून बाहेर पडलं पाहिजे.

मात्र, भ्रष्‍टाचाराच्‍या विळख्‍यात ते अडकले आहेत. मंत्री राहिलो तर संरक्षण मिळेल आणि सत्‍तेतून बाहेर पडलो तर बेड्या पडतील, अशी भीती त्‍यांना सतावत आहे.

त्यामुळे काँग्रेस सत्तेतून बाहेर पडणार नाही. यावरून काँग्रेसच्या सध्याच्या नेत्यांना पक्षाच्या भवितव्याची चिंता नसल्याचं स्पष्ट होतं,’ असंही विखे पाटील म्हणाले आहे.

एकीकडे भाजपकडून केंद्रीय तपास यंत्रणाचा गैरवापर आणि कारवाई टाळण्यासाठी इतर पक्षांतून भाजपमध्ये प्रवेश केलेले नेते, यासंबंधी चर्चा सुरू असतानाच भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेससंबंधी हे विधान केलं आहे.

केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्‍याच्‍या महाविकास आघाडीच्‍या नेत्‍यांकडून होत असलेल्‍या आरोपाचा त्यांनी इन्‍कार केला.

यावर ते म्हणाले, ‘केवळ आपलं अपयश झाकण्‍यासाठी असे आरोप केले जात आहेत. भ्रष्‍टाचाराची प्रकरणं उघड होतील अशी भीती असल्‍यानंच जनतेचं लक्ष विचलीत करण्‍याचं काम महाविकास आघाडीच्‍या नेत्‍यांकडून होत आहे.’

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts