ताज्या बातम्या

Google Pixel Tablet : ठरलं तर मग! ‘या’ दिवशी लॉन्च होणार गुगलचा पहिला पिक्सेल टॅबलेट, जाणून घ्या खासियत

Google Pixel Tablet : गुगल ही एक देशातील दिग्ग्ज टेक कंपनी आहे. कंपनी आपल्या वापरकर्त्यांसाठी नवनवीन स्मार्टफोन उपलब्ध करून देत असते. अशातच कंपनी आपल्या वापरकर्त्यांसाठी पिक्सेल टॅबलेट लाँच करणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे गुगलचा पहिला पिक्सेल टॅबलेट असणार आहे.

त्यामुळे त्यात कंपनी कोणकोणते फीचर्स देणार याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे. याच्या स्पेसिफिकेशन्स आणि किंमतीबद्दल कंपनीकडून अजूनही कोणतीही अधिकृत देण्यात आली नाही. तसेच यात विशेष चार्जिंग डॉक मिळण्याची शक्यता आहे.

हा टॅबलेट मागच्या बाजूस सिंगल कॅमेरासह येणार असून ज्याला LED सपोर्ट मिळणार नाही. याच्या तुम्हाला मध्यभागी OnePlus टॅबलेटसारखा कॅमेरा मिळेल.

जाणून घ्या Google पिक्सेल टॅब्लेट स्पेसिफिकेशन (अपेक्षित)

इंटरनेटवर समोर आलेल्या माहितीनुसार, आता हा टॅबलेट 10.95-इंचाच्या डिस्प्लेसह येईल जो Google USI 2.0 स्टाइलसला सपोर्ट करणार आहे. स्टोरेजचा विचार केला तर कंपनी हा टॅबलेट 128GB आणि 256GB स्टोरेज वेरिएंटमध्ये लॉन्च करू शकते. गुगल टॅबलेटला पिक्सेल मिनी आणि पिक्सेल प्रो या दोन मॉडेलमध्ये लॉन्च करू शकते असे बोलले जात आहे.

सॉफ्टवेअर डेव्हलपर Kuba Wojciechowski यांच्या मते, कंपनी या टॅबलेटमध्ये विशेष चार्जिंग डॉक देण्याची दाट शक्यता आहे. तसेच, कंपनीचा हा टॅबलेट Google Tensor G2 सपोर्टसह येईल, जो Pixel 7 लाइनअपमध्ये दिसेल. गुगल पिक्सेल टॅबलेटला मागच्या बाजूस अल्ट्रा वाइड अँगल कॅमेरा मिळेल तर सेल्फीसाठी फ्रंट कॅमेरा असणार आहे.

काय आहे Google I/O इव्हेंट तारीख

हे लक्षात घ्या की याच्‍या स्पेसिफिकेशन्स आणि किंमतीबद्दल कंपनीने अजूनही कोणतीही अधिकृत माहिती नाही. Google आगामी इव्हेंटमध्ये आपला पहिला टॅबलेट लॉन्च करणार आहे. हा इव्हेंट10 मे रोजी माउंटन व्ह्यू कॅलिफोर्निया शोरलाइन अॅम्फीथिएटर येथे पार पडणार आहे.

Google Pixel 7a या दिवशी लाँच केला जाणार

या इव्हेंटमध्ये, कंपनी Android 14 लॉन्च करेल, ज्याचे अनेक फीचर्स अगोदरच समोर आले आहेत. इतकेच नाही तर Google Pixel 7a स्मार्टफोन देखील इव्हेंटमध्ये लॉन्च केला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. लीक्सनुसार, Google Pixel 7a मध्ये 6.1-इंचाचा AMOLED डिस्प्ले मिळू शकतो, ज्याचा रिफ्रेश दर 90Hz असू शकतो.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts