Optical Illusion : दररोज सोशल मीडियावर लोकांना कोड्यात टाकणारे फोटो व्हायरल होत असतात. या फोटोमधून तुम्हाला आव्हान देऊन काहीतरी शोधायला सांगतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे अनेकांना फोटोमध्ये लपलेली वस्तू किंवा प्राणी शोधताना चांगलाच घाम फुटतो.
असाच एक गोंधळात टाकणारा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जर तुमचे तुमचे डोळे गरुडापेक्षा तीक्ष्ण असतील तरच हे आव्हान स्वीकारा. कारण हा सरडा शोधताना 99 टक्के लोक अयशस्वी झाले आहेत. तुम्हाला सापडतोय का हा लपलेला सरडा पहा.
तुमच्या डोळयासमोर असणारा सरडा तुम्हाला दिसतोय का?
ऑप्टिकल इल्यूजन असे दर्शविते की आपण जे पाहतो ते शक्यतो खरोखर नसते. त्यामुळे हा भ्रम नेमका काय आहे हे शोधून काढले पाहिजे. ते शोधत असताना खूप मजेदार आणि रोमांचक बनते. आता तुम्हाला चित्रात लपून बसलेला एका सरडा शोधायचा आहे तेही फक्त 5 सेकंदात. तुम्हाला चित्रात खडकांच्या मधोमध लहान वाळवंटाचा एक भाग दिसत असेल. त्या ओसाड जमिनीवर एक सरडा लपून बसला आहे.तो तुम्हाला 5 सेकंदात सरडा ओळखावा लागणार आहे.
फक्त 5 सेकंदात शोधून दाखवा
बर्याच जणांना, फक्त 5 सेकंदात सरडा शोधता येत नाही. त्यांच्यासाठी ते खूप आव्हानात्मक असते, तर काही जण लगेच ते शोधून दाखवतात. उच्च पातळीचे लक्ष आणि एकाग्रता कौशल्य असलेले लोकांना दिलेल्या वेळेत सरडा शोधता येतो. तुम्हाला सरडा सापडला का?
हे चित्र काळजीपूर्वक पहा. सरड्याच्या आकारासारखे काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करा. हे लक्षात घ्या की सरडा जवळजवळ खडकांच्या रंगासारखाच आहे. सरडा चित्राच्या मध्यभागी असून त्याच्या शरीरावर लाल चिन्ह आहे. सरड्याच्या प्रजातीला टॉडहेड अगामा असे म्हणतात. हे आशिया आणि मध्य पूर्वेच्या वाळवंटात राहतात.