आम्ही बोलायला लागलो तर ‘त्यांना’ कुठून कुठून कळा येतील बघा’

4 years ago

अहमदनगर Live24 टीम, 2 एप्रिल 2021 :- भाजपच्या मीडिया सेलचे प्रमुख नवीन कुमार जिंदल यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार शरद पवार यांच्या आजारपणावर केलेली टीका दुर्दैवी आहे. भाजपने दिलीगिरी व्यक्त करुन हे थांबवावं.

दोन दिवसात दिलगिरी व्यक्त केली नाही तर फार मोठी किंमत मोजावी लागेल. आम्ही बोलायला लागलो तर त्यांच्या (भाजप नेते) कुठून कुठून कळा येतील बघा’ असा असा इशारा राष्ट्रवादीचे नेते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी कोल्हापुरात दिला.

भाजपच्या मीडिया सेलचे प्रमुख नवीन कुमार जिंदल यांनी सोमवारी यासंदर्भात ट्विट केले होते. ‘सचिन वाझे यांनी राष्ट्रीय तपास यंत्रणेला असं काय सांगितलं की, शरद पवार यांच्या पोटात इतक्या जोरात दुखायला लागलं.

त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली. आता तर वाटतं की, ‘दाल में कुछ काला नही, पुरी दालही काली है’ असे नवीन कुमार जिंदल यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

शरद पवार यांची ही पोटदुखी पाहता, पश्चिम बंगालच्या आधी महाराष्ट्रातच सत्तांतर होईल, असे वाटत असल्याची खोचक टिप्पणीही नवीन जिंदल यांनी केली होती.

शरद पवार यांची पोटदुखी बरी झाली असो वा नसो, लक्षात ठेवा सत्य बाहेर आल्यावाचून राहणार नाही, असा इशारा जिंदाल यांनी काल पुन्हा दिला होता.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रकृतीचा निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे प्रकरणाशी संबंध जोडणं भाजपच्या मीडिया सेल प्रमुखांना महागात पडू शकतं. भाजपने दिलगिरी व्यक्त केली नाही, तर फार मोठी किंमत मोजावी लागेल.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|

Recent Posts