ताज्या बातम्या

Car Heater : तुम्हीही हीटर किंवा ब्लोअर वापरत असाल तर ‘या’ चुका टाळा, नाहीतर तुमच्या जीवावर बेतेल

Car Heater : अनेकजण कारमध्ये उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये एसी आणि थंडीच्या दिवसांमध्ये हिटर आणि ब्लोअरचा वापर करतात. सध्या थंडीचे दिवस सुरु आहेत.

त्यामुळे तुम्हीही जर तुमच्या कारमध्ये हिटर आणि ब्लोअरचा वापर करत असाल तर वेळीच सावध व्हा. कारण तुमच्या काही चुकांमुळे तुमचा जीव जाऊ शकतो. कसे ते जाणून घेऊयात सविस्तर.

विंडस्क्रीनवर असणारे धुके

थंडीच्या दिवसात जर तुम्ही हीटर वापरत असाल तर वाहनाच्या आतील तापमान जास्त वाढू देऊ नका. कारण थंडीच्या दिवसात कारचे आतील तापमान वाढते आणि बाहेरचे तापमान खूप कमी असते.त्यामुळे वाहनाच्या विंडस्क्रीनवर धुके साचतात. त्यामुळे समोरून येणारे वाहन दिसत नाही. त्यासाठी थोडा वेळ एसी चालवावा.

ऑक्सिजनची कमतरता

हीटर किंवा ब्लोअर जास्त वेळ वापरला तर कारमध्ये ऑक्सिजनची कमतरता जाणवते. त्यामुळे तुम्हाला गुदमरल्यासारखे होते. असे होऊ नये म्हणून तुमच्या कारची खिडकी थोडी उघडा. वाहनांमध्‍ये एअर सर्कुलेशन ऑन-ऑफ करण्‍यासाठी एक बटण असते त्यामुळे तुमच्या वाहनात ताजी हवा भरली जाते.

CO2 गॅस तयार होऊ देऊ नका

सतत तुम्ही हिटर किंवा ब्लोअर चालू ठेवत असाल तर कार्बन डायऑक्साइड आणि कार्बन मोनोऑक्साइडसारखे वायू कारच्या आत तयार होतो. असे झाल्यास तुम्हाला श्वास घेण्यास त्रास होतो.

लहान मुलांची काळजी घ्या

अनेकजण आपल्या मुलांना हीटर किंवा ब्लोअर चालू करून त्यांना गाडीतच ठेवतात. जर तुम्हीही चूक करत असाल तर ही चूक टाळा, कारण तुमच्या मुलाने गाडी आतून लॉक केली तर तुम्हाला त्याचा फटका बसेल. त्याचबरोबर ब्लोअर चालू असेल तर मुले गुदमरू शकतात.

त्यामुळे जर तुम्हीही हिटर आणि ब्लोअरचा वापर करत असाल तर या चुका करू नका. या चुका टाळा नाहीतर यामुळे तुमचा किंवा इतरांचा जीव जाऊ शकतो.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office
Tags: Car Heater

Recent Posts