ATM Alert: एक वेळ अशी होती की, पैसे काढण्यासाठी (withdraw money) बँकेत (bank) लांबच लांब रांगेत उभे राहावे लागत असे. स्वतःच्या खात्यातून पैसे काढण्यासाठी स्लिप भरावी लागायची आणि मग कुठेतरी पैसे हातात यायचे.
या सगळ्यात मधेच सर्व्हरचा प्रॉब्लेम आला तर प्रॉब्लेम झाला. मात्र आता काळ बदलला असून आता बँक खात्यातून पैसे काढण्यासाठी रांगा लावण्याची गरज नाही. वास्तविक, आता लोक एटीएम कार्डद्वारे (ATM card
) एटीएम मशीनमधून (ATM machine) पैसे काढतात.हे खूप सोपे आहे आणि वेळ लागत नाही. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की तुम्ही मृत व्यक्तीचे एटीएम कार्ड वापरत असाल तर काय होईल? असे करणे चुकीचे आहे का? मृत व्यक्तीच्या बँक खात्यातून पैसे काढणे हा दंडनीय गुन्हा आहे का? तर याचा नियम काय आहे ते आम्ही तुम्हाला सांगतो
शिक्षेची तरतूद
वास्तविक, अनेक वेळा अशी प्रकरणे समोर येतात, जिथे लोक एटीएम कार्ड वापरून मृत व्यक्तीचे पैसे काढतात. परंतु येथे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे की असे करणे बेकायदेशीर आहे. नॉमिनी देखील बँकेला कळवल्याशिवाय मृत व्यक्तीच्या बँक खात्यातून पैसे काढू शकत नाही. असे कोणी करताना आढळल्यास नियमानुसार त्याला शिक्षा होऊ शकते.
नॉमिनी मृत व्यक्तीच्या बँक खात्यातून पैसे काढू शकतो, परंतु काहीवेळा खात्यात एकापेक्षा जास्त नॉमिनी असतात. अशा परिस्थितीत, नॉमिनीला बँकेला संमतीपत्र दाखवावे लागते आणि त्यानंतरच तुम्ही मृत व्यक्तीच्या बँक खात्यातून पैसे काढू शकता.
पैसे काढण्याचा हा मार्ग
अशी कोणतीही व्यक्ती जी अशा खात्याची नॉमिनी आहे, ज्याच्या खातेधारकाचा मृत्यू झाला आहे, तो खात्यात जमा केलेल्या पैशासाठी दावा करू शकतो. यासाठी नॉमिनीला एक फॉर्म भरावा लागेल आणि मृत व्यक्तीच्या बँक खात्याचे पासबुक, खात्याचा टीडीआर, चेकबुक, मृत्यू प्रमाणपत्र, त्याचे आधार आणि पॅन कार्ड द्यावे लागेल. यानंतर बँकेकडून तुम्हाला पैसे दिले जातात.