ताज्या बातम्या

Benefits and side effects Of Soap : थंडीच्या दिवसात साबण लावून अंघोळ करत असाल तर सावधान, जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला

Benefits and side effects Of Soap : थंडीच्या दिवसात सगळ्यांनाच गरम पाण्याने अंघोळ करायला खूप आवडते. त्यात काहीजण साबण लावून अंघोळ करतात तर काहीजण साबण न लावता अंघोळ करतात.

जर तुम्हीही साबण लावून अंघोळ करत असाल तर तज्ज्ञांचा सल्ला जाणून घ्या. नाहीतर त्याचा परिणाम तुमच्या त्वचेवर होऊ शकतो. साबण लावून अंघोळ केल्याने कोणते फायदे आणि तोटे होतात ते जाणून घेऊयात.

तज्ज्ञांच्या मतानुसार, जे लोक अंघोळ करत असताना रोज साबण वापरतात, त्यांचे शरीर अतिशय स्वच्छ दुर्गंधी येत नाही. साबणाने आंघोळ करण्याचे इतरही खूप फायदे आहेत. साबण लावल्याने जंतू आणि बॅक्टेरिया काढून टाकले जातात. तर बुरशीजन्य रोग दूर राहतात.

त्यासाठी योग्य प्रकारचा साबण वापरणे खूप गरजेचे आहे. आपल्या त्वचेवर साचलेल्या धुळीसह घाण आणि चिकटपणा तसेच मृत त्वचा सहज निघणाऱ्या साबणेचा वापर करावा.

सर्व प्रकारच्या हवामानात साबणेचा वापर केला जातो. परंतु, थंडीच्या दिवसात त्वचेला जास्त कोरडेपणा आला तर मॉइश्चरायझिंग साबण लावावा. त्यामुळे त्वचा मुलायम आणि ओलावा राहतो. तुम्ही आता सामान्य साबण लावूनही मॉइश्चरायझर लावून त्वचा मऊ ठेवू शकता.

अतिवापर केला तर त्यातील अल्कधर्मी घटक त्वचेला कोरडे करतात. यामुळे त्वचेतील आर्द्रता कमी होते. त्यामुळे आता तुम्ही मॉइश्चरायझिंग क्रीम लावून त्वचेला कोरडे होण्यापासून वाचवू शकता.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts