तू माझ्या विरोधात पोलीस केस केल्यास मी तुला जिवंत सोडणार नाही

अहमदनगर Live24 टीम,  15 फेब्रुवारी 2022 :- दिव्यांग तरूणीला लग्नाचे अमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना ऑक्टोबर 2019 ते डिसेंबर 2020 दरम्यान वेळोवेळी घडली आहे. याप्रकरणी तरूणाविरूध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नगर तालुक्यातील तरूणीने फिर्याद दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गणेश रघुनाथ मडके (रा. सोनेसांगवी ता. शेवगाव) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, नगर तालुक्यातील तरूणी खासगी नोकरी करून आपला उदरनिर्वाह करते. तिची गणेश मडके सोबत ओळख झाली होती.

गणेशला फिर्यादी या दिव्यांग असल्याची माहिती होती. फिर्यादीला गणेशने लग्न करण्याचे अमिष दाखविले. त्याने ऑक्टोबर 2019 ते डिसेंबर 2020 या दरम्यान तिच्यावर अत्याचार केला.

तसेच गणेशने फिर्यादीकडून वेळोवेळी 95 हजार रूपये उसने घेतले ते परत न करता फिर्यादीची फसवणूक केली. तुला काय करायचे ते कर, तू माझ्या विरोधात पोलीस केस केल्यास मी तुला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts