ताज्या बातम्या

ज्यादा द्याल ‘ताण’ तर उलटा घुसेल बाण !

औरंगाबाद : महापालिका निवडणुकीच्या (Municipal elections) तोंडावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची आज औरंगाबादमध्ये (Aurangabad) सभा होणार असून या सभेसाठी शिवसैनिकांकडून पुरेपूर बंदोबस्त करण्यात आला आहे.

सभेपूर्वी औरंगाबादमध्ये चोख सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे शिवसेनेनं देखील नियमावली जाहीर केली आहे. यामुळे आजच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या सभेकडं विशेष लक्ष लागून आहे.

तसेच शिवसेनेचे माजी नगरसेवक (Shivsena Corporator) चेतन कांबळे यांच्या जाहिरातीची (Advertisement) औरंगाबादेत सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. या जाहिरातीमधून ‘ज्यादा द्याल ‘ताण’ तर उलटा घुसेल बाण ! अशी थेट टीका भाजपवर (Bjp) करण्यात आली आहे.

दरम्यान, औरंगाबादमध्ये मुख्यमंत्री कुणावर टीका करणार? राज ठाकरेंना काय उत्तर देणार? औरंगाबादच्या नामांतरावर मुख्यमंत्री काही बोलणार का? भाजपवर आजच्या सभेतून काय टीका करणार? याकडे अवघ्या राज्याच लक्ष लागून आहे.

तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादमध्ये पोलिसांचा (Police) तगडा बंदोबस्त असणार आहे. सभेसाठी दीड हजार पोलिसांचे सुरक्षा कवच आहे.

यामध्ये ५ डीसीपी, 7 एसीपी, 30 पीआय, १०० पीएसआय आणि १२०० पोलीस असणार आहे. तर एसरपीएफच्या तब्बल २ तुकड्या याठिकाणी तैनात असतील. पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांच्या निगरानीखाली हजारो पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Ahmednagarlive24 Office

Recent Posts