ताज्या बातम्या

“तुम्ही न्यायासाठी की माझा राजीनाम्यासाठी उपोषणाला बसलाय, तर उद्याच राजीनामा देतो”; बच्चू कडू आंदोलक शेतकऱ्यांवर भडकले

अमरावती : विदर्भातील प्रकल्पग्रस्त शेतकरी (Farmer Protest) विविध मागण्यांसाठी अमरावतीत (Amravati) उपोषणाला बसले आहेत. यावेळी आमदार बच्चू कडू यांनी या शेतकऱ्यांची भेट घेतली त्यावेळी शेतकऱ्यांनी बच्चू कडू (Bachchu Kadu) यांच्या राजीनाम्याची मागणी केली त्यावर ते भडकल्याचे दिसले आहेत.

यावेळी शेतकऱ्यांचा रोष पाहायला मिळाला आहे. मागण्या मान्य होत नसल्याने राज्यमंत्री बच्चू कडू यांनी मंत्रिपदाचा राजीनामा (Minister resigns) द्यावा अशी मागणी आंदोलक शेतकऱ्यांनी केली होती.

यावर बोलताना बच्चू कडू यांचा पारा चांगलाच वाढल्याचे दिसले. ते म्हणाले, तुम्ही न्यायासाठी उपोषणाला (Fasting) बसला आहात की,

माझ्या राजीनाम्यासाठी असा सवाल करत, मंत्रिपदाने मला फरक पडत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. तुमची ईच्छा असेल तर उद्याच राजीनामा देतो असे वक्तव्य बच्चू कडू यांनी केले आहे.

विदर्भातील प्रकल्पग्रस्त शेतकरी मागण्यासाठी 8 दिवस झाले उपोषणाला बसले आहेत. यावेळी बच्चू कडू यांनी भरपावसात उपोषणाला बसलेल्या शेतकऱ्यांना भेट दिली आहे.

प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात 16 तारखेला जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली आहे.

या बैठकीत आम्ही नक्कीच शेतकऱ्यांच्या मागण्यांवर तोडगा काढू, शेतकऱ्यांचे प्रश्न लवकरच मार्गी लावले जातील. असेही त्यांनी सांगितले आहे.

Renuka Pawar

Published by
Renuka Pawar

Recent Posts