ZP election : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उमेदवारी मिळावी म्हणून इच्छुकांकडून नेत्यांची मनधरणी केली जाते. त्यांच्या आवडीच्या गोष्टी करण्यावर आणि स्वत:चे शक्तिप्रदर्शन करण्यावर भर दिला जातो.
सध्या निवडणुकांचे वातावरण सुरू झाले आहे. अशातच साताऱ्यात विधानपरिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी कार्यकर्त्यांसाठी वेगळाची योजना सूचविली आहे. जिल्हा परिषद निवडणुकीचं तिकीट पाहिजे तर १० झाडं लावून दाखवा, असा फतवाच काढला पाहिजे.
यातून झाडे लावण्याची मोठी चळवळ निर्माण होईल. भोंगे लावायचे का नाही लावायचे हा वाद करण्यापेक्षा झाडं लावलेली परवडली असेही रामराजे निंबाळकर म्हणाले.
जागतिक पर्यावरण दिनानिमीत्त फलटण मध्ये १००० झाडं लावुन पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. त्यावेळी निंबाळकर बोलत होते.