Indian Railways new guidelines : दररोज रेल्वेने लाखो लोक प्रवास करत असतात. जर तुम्हीही रेल्वेने प्रवास करत असाल तर ही बातमी काळजीपूर्व वाचा नाहीतर तुम्हीही मोठ्या संकटात सापडू शकाल.
कारण रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी रेल्वे प्रशासनाने काही नियम लागू केले आहेत. ज्या प्रवाशांकडून नियमाचे उल्लंघन होईल त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे.
हा निर्णय लागू होणार
आता नवीन नियमांनुसार रात्री प्रवास करत असताना कोणत्याही प्रवाशाला रात्री 10 नंतर मोबाईलवर मोठ्याने बोलू दिले जाणार नाही. त्याचबरोबर कोणत्याही प्रवाशाला मोठ्या आवाजात संगीत ऐकता येणार नाही
त्याशिवाय प्रवाशांच्या तक्रारी आल्यास या लोकांवर त्वरित कारवाई केली जाणार आहे. जरी या कारवाईनंतर प्रवाशांना काही त्रास झाला तर त्याची पूर्ण जबाबदारी ही रेल्वे प्रशासनाची असणार आहे.
कर्मचार्यांसाठीही नवीन आदेश
दरम्यान,मोठ्या आवाजाच्या तक्रारीशिवाय रात्रीच्या वेळी दिवे जळत असल्याच्या तक्रारीही रेल्वे प्रशासनाकडे येत आहेत. त्यामुळे या नवीन नियमानुसार रात्रीच्या वेळी प्रवास करताना रात्रीचे दिवे वगळता सर्व दिवे बंद केले जाणार आहेत.
चेकिंग कर्मचारी, आरपीएफ, इलेक्ट्रिशियन, केटरिंग कर्मचारी आणि देखभाल कर्मचारी रात्री शांततेत काम करतील. नुकतेच रेल्वेने ट्रेनमध्ये तागाचे कपडे, ब्लँकेट आणि पडदे पुरवणे पुन्हा सुरू करण्याचे आदेश जारी केलेले होते.
त्यामुळे आता सर्व प्रवाशांनी रात्रीच्या वेळी नवीन नियम लक्षात ठेवावे. नाहीतर रेल्वे प्रशासनाकडून तुमच्यावर कडक कारवाई केली जाईल.