पतसंस्थेने जप्त केलेल्या मालमत्तेवर बेकायदेशीर ताबा; तिघांविरूध्द गुन्हा

अहमदनगर Live24 टीम,  14 फेब्रुवारी 2022 :-  लक्ष्मी महिला नागरी सहकारी पतसंस्था, दिल्लीगेट या पतसंस्थेचे कर्ज थकविल्याप्रकरणी जप्त केलेल्या मालमत्तेवर तिघांनी ताबा घेतला.

याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगेश रमेश कांबळे (पत्ता माहिती नाही) व इतर दोन अनोळखी व्यक्तींवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लक्ष्मी महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या व्यवस्थापक स्वाती संजय शिरसुल (वय 48 रा. सातभाई गल्ली, दिल्लीगेट, नगर) यांनी फिर्याद दिली आहे.

लक्ष्मी महिला नागरी सहकारी पतसंस्थेचे सन 2014 पासून किसनचंद रोहीडा व स्वामीनी रोहीडा (दोघे रा. दाळमंडई, नगर) खातेदार आहेत.

त्यांनी पतसंस्थेकडून घेतलेली कर्जाची रक्कम वेळेत परत न केल्याने पतसंस्थेने त्यांचे दाळमंडई येथील घर जप्त करून त्याला लोखंडी गेट, कुलूप लावुन ते सील केले आहे.

तशी नोटीस त्याठिकाणी चिटकवली होती. त्यानंतर मंगेश कांबळे व इतर दोन अनोळखीने सदर लोखंडी गेट व कुलूप तोडून चोरी व बेकायदेशीरपणे ताबा घेण्याच्या गैर हेतूने घुसले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस हवालदार सुनील आंधळे करीत आहेत.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts