ताज्या बातम्या

IMD Alert : नागरिकांनो लक्ष द्या ! ‘या’ राज्यांमध्ये पुन्हा धो धो पाऊस ; अनेक राज्यांमध्ये येणार थंडीची लाट, वाचा सविस्तर

IMD Alert : येत्या काही दिवसातच आपण सर्वजण नवीन वर्षात प्रवेश करणार आहोत मात्र त्यापूर्वीच देशातील हवामानात मोठा बदल पहिला मिळत आहे. यामुळे हवामान विभागाने देशातील काही राज्यात पुन्हा एकदा धो धो पावसाचा इशारा दिला आहे तर काही राज्यांना थंडीच्या लाटेचा इशारा दिला आहे.

आम्ही तुम्हाला सांगतो सध्या देशातील पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये तापमानात घट पहिला मिळत आहे. याच विभागाने दिलेल्या माहितीनुसार येणाऱ्या काही दिवसांत हिमाचल प्रदेश, पंजाबच्या काही भागांमध्ये एक किंवा अधिक वादळाची शक्यता आहे.

हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, पंजाब, उत्तर राजस्थान आणि हिमाचल प्रदेशच्या काही भागात आज थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. येत्या 24 तासांत दक्षिण आंध्र प्रदेश, तामिळनाडू, अंदमान आणि निकोबार बेटांच्या दक्षिण भागात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे तर 20 ते 22 डिसेंबर दरम्यान, तमिळनाडू, दक्षिण आंध्र प्रदेशातही हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो आणि काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो. 21 डिसेंबरपासून केरळमध्ये हलका पाऊस पडू शकतो.

या राज्यांमध्ये पावसाची शक्यता

भारतीय हवामान खात्यानुसार, अंदमान आणि निकोबार बेटे, केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि ओडिशासह महाराष्ट्राच्या काही भागात पुढील 24 तासांत मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. आज अंदमान आणि निकोबार बेटांवर अनेक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडेल, याशिवाय केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि ओडिशा तसेच महाराष्ट्रासाठी गडगडाटी वादळाचा इशारा देण्यात आला आहे.

या राज्यांमध्ये थंडी आणि धुके वाढणार  

येत्या काही दिवसांत उत्तर प्रदेशात थंडी वाढणार असून, त्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांचे तापमानही घसरण्याची शक्यता आहे. बिहारमध्ये धुके वाढल्याने तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये हवामान स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. देशातील उर्वरित भागात हवामान कोरडे राहील. पंजाबमध्ये पुढील तीन दिवस ईशान्य भारतातील बिहार आणि पूर्व उत्तर प्रदेशमध्ये थंड लाटेसह मध्यम ते दाट धुके राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

हे पण वाचा :- FD Rates: गुड न्यूज ! ‘या’ बँकेत गुंतवणूक करणारे होणार मालामाल ; आता ‘इतका’ मिळणार पैसा

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts