IMD Alert : देशातील विविध भागात मागच्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे तर काही ठिकाणी थंडीची लाट आली आहे. यातच आता पुन्हा एकदा भारतीय हवामान विभागाने देशातील तब्बल 9 राज्यांना हलका ते मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. चला तर जाणून घ्या हवामान विभागाने दिलेल्या लेटेस्ट अपडेट्सबद्दल संपूर्ण माहिती.
भारतीय हवामान विभागाने तामिळनाडू आणि केरळसह 9 राज्यांमध्ये मध्यम ते मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. हवामान खात्याच्या मते, पुढील 5 दिवसांत लक्षद्वीप, केरळ, कर्नाटक, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशच्या काही भागांत हलका ते मध्यम पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे.
पुढील चार दिवसांत ओडिशाचे किमान तापमान तीन ते पाच अंशांनी कमी होईल. पुढील 3 दिवसांत पूर्व राजस्थानमध्ये काही ठिकाणी थंडीची लाट कायम राहील. पुढील 4-6 दिवसांत दक्षिण द्वीपकल्पीय भारतात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, आज अंदमान आणि निकोबार बेटांवर 1 किंवा 2 ठिकाणी मुसळधार पावसासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि आंध्र प्रदेश, तामिळनाडू, गोवा आणि कर्नाटकच्या काही भागात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.
दक्षिण कर्नाटक, उत्तर तमिळ नाडू आणि आंध्र प्रदेशच्या काही भागात पावसाची शक्यता आहे. दुसरीकडे, थंडीच्या लाटेमुळे तापमानात घट नोंदवली जाऊ शकते. लक्षद्वीप आणि अंदमानसह आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि गोव्याच्या किनारी भागात पावसाची शक्यता आहे.
दक्षिण भारतातील काही राज्यांमध्ये पावसाची शक्यताही हवामान खात्याने व्यक्त केली आहे. पुढील 4-5 दिवसांत वायव्य आणि लगतच्या मध्य भारताच्या अनेक भागांमध्ये किमान तापमान 8-10°C च्या श्रेणीत राहण्याची शक्यता आहे. लडाख, जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडसह सर्व डोंगराळ राज्यांमध्ये बर्फासह पाऊस पडू शकतो.