IMD Alert : देशात आणि राज्यात गेल्या दोन महिन्यांपासून मान्सूनच्या पावसाचे (Monsoon Rain) सत्र सुरु आहे. पावसाचा परतीचा प्रवास सुरु आहे. राज्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस (Heavy Rain) कोसळत आहे. नद्यांना पूर आला आहे तर काही नद्यांकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
भारतीय हवामान खात्याने (IMD) सोमवारी भारताच्या अनेक भागात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. भारताच्या मध्य आणि दक्षिण भागात मुसळधार पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे. आयएमडीने विविध जिल्ह्यांसाठी ऑरेंज आणि रेड अलर्ट जारी केला आहे.
उत्तर प्रदेश, केरळ, कर्नाटक आणि दिल्ली-एनसीआर सारख्या अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाने कहर सुरूच ठेवला आहे. आपल्या ताज्या हवामान अंदाजात, IMD ने म्हटले आहे की, “ओडिशा, छत्तीसगड, विदर्भ, गुजरात, कोकण आणि गोवा, मध्य महाराष्ट्र आणि तेलंगणातील घाट भागात पुढील 2-3 दिवसांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.”
महाराष्ट्राच्या काही भागात रेड अलर्ट जारी
IMD ने पुणे आणि रायगड, रत्नागिरी, सातारा यासह पश्चिम महाराष्ट्रातील (Maharashtra) काही भागांसाठी रेड अलर्ट (Red Alert) जारी केला आहे. IMD ने पालघर, ठाणे, सिंधुदुर्ग आणि कोल्हापुरात मुसळधार ते अति मुसळधार पावसासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
दरम्यान, रायगड, रत्नागिरी, पुणे आणि सातारा येथे अतिवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. नागपूर, वर्धा, गोंदिया आणि वाशीमसह महाराष्ट्रातील काही भागांमध्येही यलो अलर्ट (Yellow Alert) जारी करण्यात आला आहे.
IMD ने ओडिशा, आंध्र प्रदेशच्या काही भागांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे
हवामान खात्याने सांगितले की, सोमवारी सकाळपर्यंत ओडिशातील कालाहांडी आणि रायगडा जिल्ह्यात काही ठिकाणी अतिमुसळधार पावसासाठी IMD ने रेड अलर्ट जारी केला आहे.
हवामान खात्याने सोमवारी खुर्द, पुरी, रायगड, कालाहंडी, गजपती, गंजम, नयागड, कंधमाल, नबरंगपूर, मलकानगिरी आणि कोरापुट जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिवृष्टीचा इशारा दिला.
पश्चिम बंगाल, दिल्लीतही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे
बंगालमध्ये 9 आणि 10 ऑगस्ट रोजी दक्षिण बंगालच्या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. याशिवाय राजधानी दिल्लीत हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
IMD ने राजस्थानमध्ये मुसळधार पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. कर्नाटकातील काही भागात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. केरळमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.