IMD Alert : गेल्या काही दिवसांपासून राज्यात मुसळधार पाऊस (Heavy Rain) कोसळत आहे. तसेच आता परतीच्या पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. येत्या दोन दिवसांत परतीच्या पावसाला सुरुवात होण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.
मुंबईत (Mumbai) गेल्या अनेक दिवसांपासून सतत पाऊस पडत आहे, त्यामुळे जनजीवनही विस्कळीत झाले आहे. त्याचवेळी, हवामान खात्याने (IMD) आता पुढील काही दिवस शहरात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
येत्या काही दिवसांत हवामान कोरडे राहण्याची शक्यता आयएमडीने वर्तवली आहे. शहरात सध्या पडत असलेला मध्यम स्वरूपाचा पाऊस पुढील काही तासांपर्यंत कायम राहणार असला तरी तो हळूहळू कमी होईल.
महाराष्ट्रात (Maharashtra) या आठवड्यात सक्रिय मान्सूनमुळे, विविध जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. मुंबई हवामान केंद्राने महाराष्ट्रात अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
सोमवारी जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे, औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, वाशीम येथे हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केला आहे.
मंगळवारसाठी जळगाव, अहमदनगर, पुणे, सोलापूर, औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, नागपूर, वर्धा, वाशीम आणि यवतमाळ यलोमध्ये अलर्ट (Yellow Alert) जारी केला आहे.
बुधवारी जळगाव, अहमदनगर, पुणे, औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, नागपूर, वर्धा, वाशीम आणि यवतमाळमध्ये यलो अलर्ट राहील.
गुरुवारी औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, नागपूर, वर्धा, वाशीम आणि यवतमाळमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. याशिवाय शुक्रवार आणि शनिवारी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मुंबईत आज, 20 सप्टेंबर, मंगळवारीही दिवसभर आकाश ढगाळ राहील, असे हवामान खात्याने म्हटले आहे. यादरम्यान महानगरातील सर्वच भागात हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दुसरीकडे, उद्या म्हणजेच 21 सप्टेंबर आणि 22 सप्टेंबर रोजी मुंबईत ढगाळ आकाशासह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.
23 सप्टेंबर रोजी येथे मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे. तर 24 आणि 25 सप्टेंबर रोजी शहरात चांगला पाऊस होईल. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, मुंबईत आज किमान तापमान 24 अंश सेल्सिअस आणि कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.