IMD Rain Alert : राज्यातील पाऊस (Rain) काही थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे (Cyclone) महाराष्ट्रासह (Maharashtra) अनेक राज्यांमध्ये पावसाचा जोर वाढताना दिसत आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये आणखी मुसळधार पाऊस (Heavy Rain) कोसळणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने (IMD) वर्तवला आहे.
महाराष्ट्र आणि गुजरात व्यतिरिक्त, भारतीय हवामान खात्याने १९ ऑक्टोबर रोजी अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे आणि अलर्ट (Alert) जारी केला आहे. याशिवाय पर्वतांवर बर्फवृष्टी सुरू झाली असून, त्यामुळे उंचावरील भागात पारा झपाट्याने घसरण्यास सुरुवात झाली आहे.
डोंगरावरील बर्फवृष्टीमुळे देशाच्या इतर भागातही थंडी पडू लागली आहे. हवामान अंदाज एजन्सी स्कायमेटनुसार, केरळ, कर्नाटक, मध्य महाराष्ट्र, कोकण, गोवा आणि अंदमान-निकोबार बेटांवर हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो.
दुसरीकडे, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, मराठवाडा, विदर्भ, आग्नेय मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या काही भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, बंगालच्या उपसागरावर खालच्या उष्णकटिबंधीय भागात पश्चिम विक्षोभासह दाबाचे केंद्र तयार होत आहे. अरबी समुद्रातही कर्नाटक आणि कोकण किनार्याजवळील खालच्या उष्णकटिबंधीय क्षेत्रात नवीन चक्रीवादळ दाब केंद्र तयार होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे येत्या आठवडाभरात देशातील अनेक राज्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे.
IMD नुसार, पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागरावर चक्रीवादळाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. यासह हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी सांगितले की, कमी दाबाचे क्षेत्र वादळाचे रूप धारण करण्याची शक्यता आहे, परंतु त्याची तीव्रता आणि मार्गाबाबत कोणताही अंदाज जारी केला जात नाही.
ते म्हणाले की, कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यानंतरच आपण चक्रीवादळाबाबत अधिक माहिती देऊ शकतो. मात्र, हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानंतर ओडिशा सरकारने 23 ते 25 ऑक्टोबरदरम्यान सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द केल्या आहेत.