ताज्या बातम्या

IMD Rain Alert : पावसाचा जोर ओसरला; मात्र या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा; यलो अलर्ट जारी

IMD Rain Alert : राज्यातील पावसाचा (Rain) जोर काहीसा कमी झाला आहे. मात्र काही जिल्ह्यांमध्ये अजूनही मुसळधार पाऊस (Heavy Rain) कोसळणार असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात येत आहे. तसेच बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे परतीच्या पावसाला विलंब होणार असल्याचंही अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

महाराष्ट्राची (Maharashtra) राजधानी मुंबईत (Mumbai) सध्या पावसाची संततधार सुरू आहे. मात्र, आता शहरात केवळ हलक्या ते मध्यम पावसाची नोंद होत आहे. त्याच वेळी, भारतीय हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, मुंबईत 5 ते 10 ऑक्टोबर दरम्यान मान्सूनची (Monsoon) क्रिया पुन्हा एकदा तीव्र होऊ शकते.

सोमवारीही मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात एक-दोन वादळ किंवा रिमझिम पावसासह दिवसभर ढगाळ वातावरण होते. दुसरीकडे, मंगळवार, 4 ऑक्टोबर रोजी मुंबई शहरात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.

आज हवामान विभागाने विदर्भ आणि मराठवाड्यात पावासाचा अंदाज वर्तवला आहे. विदर्भातील भंडारा, गोंदिया, नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांना यलो अलर्ट (Yellow Alert) देण्यात आला आहे.

तर मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली आणि परभणी या जिल्ह्यांमना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे.

राज्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद

हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार राज्याच्या बहुतांश भागात चांगला पाऊस झाला आहे. यंदा सरासरीपेक्षा 23 टक्के अधिक पावसाची नोंद झाली आहे. मात्र, काही ठिकाणी अतिवृष्टी झाल्यामुळे शेती पिकांचे देखील नुकसान झाले आहे. ददरम्यान, राज्यात दमदार पाऊस झाल्यामुळे नदी नाल्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. तसेच धरणांच्या पाण्यासाठ्यात देखील मोठी वाढ झाली आहे.

मुंबईत मुसळधार पावसाचा अंदाज काय?

भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (IMD) मते, मुंबईत यापुढे मुसळधार पावसाचा अंदाज नाही. यासोबतच, या काळात हलका पाऊस किंवा रिमझिम पाऊस सुरू राहील, असेही आयएमडीने म्हटले आहे.

दुसरीकडे, मुंबईत 5 ते 10 ऑक्टोबर दरम्यान मान्सून पुन्हा एकदा परतण्याची शक्यता आहे. या काळात शहरात चांगल्या पावसाची नोंद होऊ शकते. हे लक्षात घेण्यासारखे आहे की, गेल्या वर्षी 12 ऑक्टोबरच्या सुमारास मुंबईत मान्सून माघारला होता.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts