आमदार राजळे यांच्या सूचनेनंतर ‘त्या’ भागाचा तात्काळ वीजपुरवठा सुरू!

अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2021 :-  सध्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी वीज बिल भरावे यासाठी महावितरणने त्या त्या भागातील वीजपुरवठा खंडित करत आहेत.

मात्र वीज पुरवठा खंडित केल्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. मात्र आमदार राजळे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना ही बाब लक्षात आणून देत तात्काळ वीज पुरवठा सुरळीत करण्याच्या सूचना दिल्याने या भागातील वीज पुरवठा सुरळीत झाला आहे.

थकीत वीज बिल वसुलीसाठी महावितरण कंपनीने शेवगाव तालुक्यातील अंत्रे सबस्टेशन अंतर्गत बक्तरपुर, मजलेशहर येथील शेतीचा वीजपुरवठा बंद केला होता.

आमदार मोनिका राजळे शेवगाव तालुक्यातील भातकुडगाव फाटा येथील एका खाजगी कार्यक्रमासाठी आल्या असता बक्तरपुर, मजलेशहर येथील शेतकऱ्यांनी त्यांची भेट घेऊन वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी विनंती केली.

आमदार मोनिका राजळे यांनी तातडीने वीज मंडळाच्या वरिष्ठ अधिकारी संपर्क साधत वीज पुरवठा सुरळीत करण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार बुधवार दि.२४ रोजी वीज पुरवठा सुरळीत करण्यात आल्याची माहिती येथील सामाजिक कार्यकर्ते विलास फाटके यांनी दिली.

आमदार मोनिका राजळे यांनी बक्तरपूर, मजलेशहर येथील शेतकऱ्यांची विज प्रश्नासंदर्भात समस्या जाणून घेत. वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला.

पुन्हा वीज मंडळाने वीज खंडीत केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा विलास फाटके यांच्या सह शेतकऱ्यांनी दिला.

  • ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts