Smartphone 13 Dangerous Apps : आजकाल अनेकांकडे स्मार्टफोन आहे. त्यामुळे कामेही झटपट होतात. परंतु, स्मार्टफोन जेवढा चांगला तेवढाच त्याचे वाईट परिणामही आहेत.
अनेकदा काही ॲप्स किंवा लिंकमुळे हॅकर्सकडून क्षणात तुमचा स्मार्टफोन हॅक केला जातो. त्यामुळे डोळे मिचकावताच बँक खाते रिकामे होते. प्ले स्टोअरवर असे काही धोकादायक ॲप्स आहेत ज्यामुळे तुमचे खाते रिकामे होते.
हॅकर्स नेहमीच बँक खाते रिकामे करण्याच्या तयारीत असतात. त्यासाठी ते सतत वेगवेगळे ॲप्स लाँच करत असतात.
धोकादायक ॲप
एक अँड्रॉइड मालवेअर थ्रेड पसरला असून जो हजारो स्मार्टफोन वापरकर्त्यांसाठी धोकादायक ठरू शकते. गुगल प्ले स्टोअरवर बरेच ॲप्स या थ्रेडशी जोडलेले आहेत. हे ॲप्स वापरकर्त्यांनी डाउनलोड केले तर वैयक्तिक माहिती चोरतात.
धोकादायक ॲप्स
ताबडतोब तुमच्या स्मार्टफोनमधून हटवा
जर तुमच्या स्मार्टफोनमध्ये हे 13 धोकादायक ॲप्सपैकी कोणतेही ॲप असेल तर ते लगेच काढून टाका. हेत्याचबरोबर तुमचा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा पासवर्ड आणि बँक लॉगिन आयडी बदला.