अहमदनगर Live24 टीम, 03 मार्च 2021:- देशावर कोरोनाचे संकट असतानाच आर्थिक संकटात आलेल्या 10 बँकांचे विलीनीकरण नियोजित होणार असल्याची माहिती देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली होती.
मोठ्या बँकेत बर्याच लहान बँकांचा समावेश केला जात आहे. यामुळे 1 मार्चपासून अनेक बँकांचे आयएफएससी कोड बदलण्यात आलेत.
त्याचबरोबर हा बदल अनेक बँकांमध्ये 1 एप्रिलपासून लागू होणार आहे. दरम्यान, देशातील अनेक मोठ्या बँकांचे विलिनीकरण झाल्यामुळे बँकिंग क्षेत्रातील नियमांमध्येसुद्धा मोठे बदल झाले आहेत.
अनेक बँकांचे आयएफएससी कोड 1 एप्रिलपासून बदलणार आहेत आणि यात कॅनरा बँकेच्या नावाचाही समावेश आहे.आपले कॅनरा बँकेत खाते असल्यास किंवा जर आपली बँक कॅनरा बँकेत विलीन होणार आहे.
सिंडिकेट बँक कॅनरा बँकेत विलीन होणार आहे, ज्यामुळे बर्याच बँकांचे आयएफएससी कोड बदलले जातील. जर आपले यापूर्वी सिंडिकेट बँकेत खाते असेल तर आपला कोड बदलेल,
म्हणून आपल्याला नवीन कोड माहीत असणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत बँकेने नवीन आयएफएससी कोडदेखील जारी केलेत, जे आतापासून आपले नवीन आयएफएससी कोड असतील.
आपण आपला नवीन आयएफएससी कोड अशा पद्धतीने जाणून घेऊ शकता… :-
विजया आणि देना बँकेचे आयएफएससी कोड 1 मार्चपासून चालणार नसले तरी, बँक ऑफ बडोदाने नवे आयएफएससी कोड मिळवण्यासाठी ग्राहकांना पर्याय उपलब्ध करुन दिलेला आहे.
ग्राहकांना नवा आयएफएससी कोड हवा असेल तर बँकेच्या वेबसाईटवर जाऊन तो मिळवता येऊ शकतो. तसेच, 18002581700 या टोल फ्री नंबरुनसुद्धा आयएफएससी कोड मिळवता येईल.
बँक ऑफ बडोदा बँकेने आयएफएससी कोड मिळवण्यासाठी 8422009988 हा नंबरुसुद्धा जारी केला आहे. या नंबरवर फोन केल्यानंतर ग्राहकांना त्यांच्या बँकेचे नवे आयएफएससी कोड मिळतील.
पंजाब नॅशनल बँकेमध्ये ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि यूनायटेड बँक ऑफ इंडिया या दोन बँकांचे विलीनीकरण करण्यात आलेले आहे.
त्यामुळे या बँकांचे जुने चेकबुक तसेच आयएफएससी कोड 31 मार्चपर्यंतच काम करतील. नवे आयएफएससी कोड घेण्याची व्यवस्था पंजाब नॅशनल बँकेनेही करुन दिलेली आहे.