नागरिकांसाठी महत्वाची बातमी ! १५ ते १८ वर्षांच्या मुलांच्या लसीकरणाला ब्रेक !

अहमदनगर Live24 टीम, 11 जानेवारी 2022 :-  नगर शहरात मागील पाच दिवसांपासून रूग्णसंख्येचा आलेख उंचावत असून सोमवारी नवे ८४ बाधित आढळले.

शहरात सायंकाळच्यावेळी विविध भागातील खाऊगल्लीत नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश महापौर रोहिणी शेंडगे व उपमहापौरांनी दिले आहेत.

दरम्यान, कोव्हॅक्सिनची कमतरता असल्याने १५ ते १८ वर्षांच्या मुलांच्या लसीकरणाला १५ जानेवारीपर्यंत ब्रेक लागला आहे.मनपात महापौर शेंडगे यांनी आरोग्य विभागाचा सोमवारी आढावा घेतला.

यावेळी उपमहापौर गणेश भोसले, आयुक्त शंकर गोरे, उपायुक्त यशवंत डांगे, आरोग्य अधिकारी डॉ. सतीश राजूरकर उपस्थित होते.

बैठकीत आरोग्य विभागाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या उपाय योजनांची माहिती दिली. मनपात महापौर शेंडगे यांनी आरोग्य विभागाचा सोमवारी आढावा घेतला.

यावेळी उपमहापौर गणेश भोसले, आयुक्त शंकर गोरे, उपायुक्त यशवंत डांगे, आरोग्य अधिकारी डॉ. सतीश राजूरकर उपस्थित होते. बैठकीत आरोग्य विभागाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या उपाय योजनांची माहिती दिली.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office