Railways Issued New Guideline : प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! रेल्वेने जारी केली नवीन मार्गदर्शक तत्त्वे, जाणून घ्या नाहीतर..

Railways Issued New Guideline : रेल्वेला देशाची जीवनवाहिनी मानली जाते. असंख्य लोक दररोज रेल्वेने प्रवास करत असतात. जर तुम्हीही प्रवास करत असाल तर बातमी तुमच्या कामाची आहे.

कारण रेल्वेने बऱ्याच नियमात बदल केला आहे. याबाबत रेल्वेने नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.रेल्वेने प्रवास करण्यापूर्वी हे नियम जाणून घ्या नाहीतर तुम्हाला आर्थिक फटका बसू शकतो.

नवीन मार्गदर्शक तत्वे जारी

मागच्या वर्षी रेल्वेने काही नवीन मार्गदर्शक तत्वे जारी केली होती. ज्यात प्रवासी तिकीट परीक्षकांना (TTE) रात्री 10 वाजल्यानंतर तिकीट तपासता येणार नाही (10 वाजल्यानंतर ट्रेनमध्ये चढणाऱ्या प्रवाशांसाठी अवैध), तसेच मधल्या बर्थच्या प्रवाशांना रात्री 10 नंतर त्यांच्या बर्थमध्ये झोपता येईल.

समजा एखाद्या प्रवाशाची सकाळी 6 वाजता ट्रेन चुकली तर, TTE त्यांची जागा इतरांना फक्त एक तासानंतर किंवा 2 आगमन स्टेशन ओलांडल्यानंतर (जे आधी असेल) देऊ शकतात.

ज्येष्ठ नागरिकांसाठी घेतला महत्त्वाचा निर्णय

सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे सर्व नियम आजही लागू आहेत. तसेच या नियमांमध्ये सरकारने आणखी काही नियम जोडले आहे. ते म्हणजे कोणत्याही प्रवाशाला मोबाईलवर मोठ्याने बोलता येणार नाही किंवा तुमच्या सीट, डब्यात किंवा कोचमध्ये मोठ्या आवाजात गाणी ऐकू शकणार नाही. सरकारने हा नियम इतर प्रवाशांच्या, विशेषत: ज्येष्ठ नागरिकांसाठी बनवला आहे.

दरम्यान अनेक दिवसांपासून रेल्वेत प्रवास करत असताना अनेकजण गाणी ऐकत असल्याच्या आणि मोठ्याने बोलत असल्याच्या बऱ्याच तक्रारी समोर येत होत्या. तसेच रेल्वे एस्कॉर्ट किंवा मेंटेनन्स कर्मचारीही मोठ्याने बोलतात. काही प्रवासी रात्री 10 वाजल्यानंतर दिवे लावतात यामुळे इतर प्रवाशांना याचा त्रास होत आहे.

तर कारवाई होणार

या सर्व गोष्टींचा विचार करून रेल्वेने नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. जर एखाद्याने या नियमांचे पालन केले नाही तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल.

तसेच जर रात्री प्रवास करत असताना प्रवाशांना हेडफोनशिवाय मोठ्याने बोलण्याची किंवा संगीत ऐकता येणार नाही. जर एखाद्या प्रवाशाने दुस-या प्रवाशाबद्दल तक्रार केली तर त्याची जबाबदारी ट्रेनमध्ये उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांची असणार आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts