ताज्या बातम्या

Income Tax Return : करदात्यांसाठी महत्त्वाची बातमी! जारी केला नवीन आदेश, आता…

Income Tax Return : जर तुम्ही कर भारत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. कारण आर्थिक वर्ष 2021-22 साठी विलंबित ITR भरण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2022 होती.

परंतु, अनेकांनी विलंबित ITR भरला नाही. त्यांनी आता काळजी करू नये कारण त्यांना अजूनही विलंबित ITR भारता येत आहे. मात्र त्यांना अतिरिक्त शुल्क भरावे लागणार आहे.

प्राप्तिकर कायदा, 1961 च्या कलम 234F अंतर्गत विलंबित ITR फाइलिंगसाठी उशीरा फाइलिंग फी/दंड आकारला जातो. लहान करदात्यांना दिलासा म्हणून, एकूण उत्पन्न 5 लाख रुपयांपेक्षा जास्त नसल्यास विलंब भरण्याची रक्कम ही 1,000 रुपयांपेक्षा जास्त नसणार आहे.

ही आहे विलंबित ITR भरण्याची अंतिम तारीख

विलंबित ITR भरण्याची शेवटची तारीख ही 31 डिसेंबर 2022 आहे. त्यामुळे जर तुम्ही अद्याप ITR भरला नसेल तर तो 1 ऑगस्ट 2022 ते 31 डिसेंबर 2022 दरम्यान भरू शकता. परंतु, तुम्हाला दंड भरावा लागतो. जर ही अंतिम मुदत देखील चुकवली तर, जोपर्यंत प्राप्तिकर विभाग कर सूचना पाठवत नाही तोपर्यंत तुम्हाला तो आयटीआर दाखल करता येणार नाही.

.. तर असे भरा पैसे

तुम्हाला विलंबित ITR भरायचा असेल तर त्यापूर्वी तुम्हाला किती विलंब शुल्क लागू केला आहे हे शोधावे लागेल. चलन क्रमांक 280 वापरून विलंबित ITR फाइलिंगसाठी विलंब शुल्क/दंड आहे. NSDL च्या वेबसाइटवर किंवा बँकेच्या शाखेत जाऊन पेमेंट ऑनलाइन करता येईल.

कायद्यानुसार, दंड/विलंब भरण्याची फी दोन प्रकारे पाहिली जाईल. एक म्हणजे जर एखाद्या व्यक्तीने ITR भरण्याच्या अंतिम मुदतीनंतर म्हणजेच 31 जुलैनंतर ITR भरला असेल तर त्या व्यक्तीला 5,000 रुपयांचा दंड लागू होईल. दुसरे म्हणजे एखाद्या व्यक्तीने1 जानेवारी ते 31 मार्च दरम्यान उशीरा ITR भरला असेल तर त्या व्यक्तीला10,000 रुपये दंड लागू होईल.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts