Tax Saving Tips : अनेक जण महिन्याला लाखो रुपयांचा पगार घेतात. त्यामुळे अशा लोकांना कर भरावा लागतो. जर तुम्हीही कर भरत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे.
कारण आता तुमचा कर वाचू शकतो. होय,जर तुम्ही काही योजनेत गुंतवणूक केली तर तुम्हाला कोणताच कार भरावा लागणार नाही. त्याशिवाय तुम्हाला परतावाही चांगला मिळतो.
PPF गुंतवणूक
तुम्ही सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीत म्हणजेच PPF मध्ये गुंतवणूक करून तुमचा कर वाचवता येतो. PPF मध्ये जमा केलेली रक्कम, काढलेली रक्कम आणि त्यात मिळणारे व्याज यावर कोणताच कर लागत नाही.
एफडीमध्ये गुंतवणूक
तुम्हाला टॅक्स वाचवण्यासाठी टॅक्स सेव्हिंग एफडीची मदत घेता येत. जर तुम्ही एफडीमध्ये 1.5 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक केली तर तुम्हाला कर सवलत मिळते.
एलआयसी पॉलिसी
कर वाचवण्यासाठी भारतीय आयुर्विमा महामंडळाची पॉलिसी फायद्याची ठरते. सर्वात अगोदर तुम्हाला पॉलिसी काढावी लागेल, त्यानंतर तुम्ही LIC ची पॉलिसी भरली असल्याचे दाखवावे लागेल.
नॅशनल पेन्शन स्कीम
जर तुम्हाला कर वाचवायचा असेल तर तुम्हाला नॅशनल पेन्शन स्कीममध्ये गुंतवणूक करू शकता. अनेक निवृत्त होणारे लोक यामध्ये गुंतवणूक करतात. तुम्ही 1.5 लाख रुपयांपर्यंत कर सवलत मिळू शकते.