गोरक्षनाथगडावर जाणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी

Ahmednagar News : नगर जवळील मांजरसुंभा येथील गोरक्षनाथ गडावर जाणारा घाट रस्ता दुरुस्ती कामामुळे २१ ते २९ मे या काळात बंद ठेवण्यात येणार आहे.

त्यामुळे या काळात गडाकडे कोणालाही पायी अथवा वाहनाने जाता येणार नाही. राज्यातून येणाऱ्या भाविकांनी व पर्यटकांनी या काळात गडावर येऊ नये, असे आवाहन देवस्थानच्या वतीने अध्यक्ष ऍड. शंकरराव कदम यांनी केले आहे.

सुमारे अडीच किलोमीटर लांबीचा हा रस्ता पायथा ते मंदिरापर्यत दुरुस्तीचे काम आजपासून सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे डोंगरावरही जाता येणार नाही. हे काम २९ मेपर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. तांत्रिक अडचण आल्यास अवधी वाढू शकतो. त्यामुळे पुढील सूचना येऊपर्यंत पर्यटकांनी गडावर येणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts