Maharashtra news : कॉपीराइट कायद्याच्या कलम ६३ अंतर्गत कॉपीराइट उल्लंघनाचा गुन्हा दखलपात्र आणि अजामीनपात्र गुन्हा असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.
त्यामुळे आता अशा प्रकारच्या गुन्ह्यांचे गांभीर्य वाढले आहे.दिल्लीतील एका प्रकरणात हा निवाडा देण्यात आला आहे. तेथील महानगर दंडाधिकारी कोर्टाने आणि नंतर उच्च न्यायालयाने हे कलम दखलपात्र नसल्याचा निर्णय दिला होता.
त्याविरोधात सुप्रिम कोर्टात याचिका दाखल झाली होती. कोर्टाने ती मंजूर केली.जर गुन्ह्यासाठी तीन वर्षे आणि त्यापुढील कारावासाची शिक्षा असेल परंतु सात वर्षांपेक्षा जास्त नसेल तर तो गुन्हा दखलपात्र गुन्हा आहे, असे निरीक्षण यावेळी नोंदविण्यात आला.
सर्वोच्च न्यायालयाने नमूद केले की कलम ६३ नुसार जास्तीत जास्त तीन वर्षांची शिक्षा होऊ शकते आणि म्हणून दंडाधिकारी शिक्षा देऊ शकतात. त्यामुळे हे कलम दखलपात्र आणि अजामीनपात्र ठरते.