अहमदनगर Live24 टीम, 10 ऑगस्ट 2021 :- कोपरगाव | आमदार आशुतोष काळे यांच्या कार्यपद्धतीने प्रभावित होवून कोपरगाव तालुक्यातील घारी येथील विरोधी पक्षाचे लक्ष्मण पवार व ज्ञानेश्वर पवार यांच्यासह तीस कार्यकर्त्यांनी घारी येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण प्रसंगी आमदार आशुतोष काळे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.
सर्व कार्यकर्त्यांचे आमदार आशुतोष काळे यांनी यावेळी स्वागत केले. घारी येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते पार पडले.
यावेळी पंचायत समिती सभापती पौर्णिमा जगधने, उपसभापती अर्जुन काळे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम,
संचालक आनंदराव चव्हाण, पंचायत समिती सदस्य अनुसयाताई होन, राहुल रोहमारे, रोहिदास होन, केशवराव जावळे, देवेन रोहमारे, सुधाकर होन,
शिवाजी जाधव, किरण होन, संतोष वाके, सचिन होन, सरपंच रामदास जाधव, उपसरपंच ठकुबाई काटकर, किसन काटकर, पमाजी पवार आदींसह कोपरगाव तालुक्यातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.