ताज्या बातम्या

“२०२४ मध्ये देशाच्या भवितव्याच्या दृष्टीने लढाई होणार”; प्रशांत किशोर यांचे मोठे वक्तव्य

कोलकाता : ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल (Election Result) जाहीर झाला आहे. पंजाब वगळता भाजपने (BJP) ४ राज्यात आपले कमळ फुलवले आहे. तर पंजाब (Punjab) मध्ये आप (AAP) ने झाडू फिरवला आहे. या राज्यांच्या निवडणूक निकालावर प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनी परीतिक्रिया दिली आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीवर (Lok Sabha elections) कोणताही परिणाम होणार नाही. २०२४ मध्ये संपूर्ण देशाच्या भवितव्याच्या दृष्टीने लढाई होणार असून ती कोणत्याही राज्यापुरती नसेल असा दावा निवडणूक रणनीतीकर (Election Strategist) प्रशांत किशोर यांनी केला आहे.

देशासाठीची लढाई ही २०२४ मध्ये लढली जाईल, तेव्हाच तिचा निकाल समजू शकेल. कोणत्याही राज्यातील निकालावरील त्याचा अंदाज बांधता येणार नाही, हे साहेबांनाही माहीत आहे. राज्यातील निकालांवरून विरोधकांवर मानसिक दबाव आणण्याचा हा प्रयत्न आहे. याला कोणी बळी पडू नये.

उत्तरप्रदेशसह (Uttar Pradesh) अन्य राज्यात भाजपने बहुमत मिळवले आहे. त्यामुळे भाजप एकहाती सत्ता मिळवणार असल्याचे दिसत आहे. काँग्रेस आणि इतर पक्षांचा सापडासुफ जाळायचे दिसत आहे.

उत्तरप्रदेश मध्ये योगी आदित्यनाथ यांनी गोरखपूर मधून निवडणूक लढून तब्बल २ लाख ४ हजार मतांनी निवडून येत विजयाचा जल्लोष केला आहे. त्यामुळे यात्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली भाजप पुन्हा सरकार स्थापन करणार आहे.

तसेच उत्तराखंड, मणिपूर आणि गोव्यातही भाजपने बहुमत मिळवत सत्ता राखल्याचे निवडणूक निकालानंतर स्पष्ट झाले आहे. या विजयामुळे भाजपच्या गोटात जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळाले आहे.

Renuka Pawar

Recent Posts