अहमदनगर Live24 टीम, 7 ऑगस्ट 2021 :- जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली असल्याने नद्या, नाले, धरणे दुथडी भरून वाहू लागले आहे.यामुळे या ठिकाणी पर्यटकांची रेलचेल वाढू लागली आहे.
यातच काही गैरप्रकार होण्याचे प्रकार देखील घडू लागले आहे. नुकतेच भंडारदरा जलाशय परिसरात संगमनेर व शेंडीतील तरुणांमध्ये धुमश्चक्री होऊन स्थानिक तीन व्यक्तींवर मद्यधुंद पर्यटकांनी चाकुचे वार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. दरम्यान राजूर, अकोले पोलिसांनी नाकेबंदी करून यातील एकास अटक केली आहे.
तर चार जण फरार आहेत. याबाबत अधिक माहिती अशी कि, अगदी शुल्लक कारणावरुन स्थानिक नागरीक आणि या तीन पर्यटाकांमध्ये वाद झाला. वाद विकोपाला गेल्याने या तरुणांनी धारधार चाकु काढला आणि थेट दिसेल त्याच्यावर वार करीत सुटले. हा प्रकार काही क्षणात गावभर पसरला.
यावेळी या तरुणांना उपस्थित व्यक्तींनी चांगलाच चोप दिला मात्र, या झडपीत त्यांनी पळ काढला ते गावकऱ्यांच्या हाती लागले नाही. यात गणेश परसय्या ,गोविंद मधे, सुनिल मधे व नवसु मधे या चौघांना बेदम मारहाण करुन त्याच्यावर शस्त्राने हल्ला करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेतले.
दरम्यान सहायक पोलिस निरीक्षक नरेंद्र साबळे यांनी तातडीने एका पथकाची नियुक्ती करून आरोपींना अटक करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. भंडारदरा जलाशय परिसरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असून राजूर पोलिस प्रत्येक वाहनाची तपासणी केल्याशिवाय सोडणार नसल्याचे पोलिस अधिकारी नरेंद्र साबळे यांनी सांगितले आहे.