अहमदनगर Live24 टीम, 2 ऑगस्ट 2021 :- राज्य पतसंस्था फेडरेशनने लॉकडाऊन काळातही उल्लेखनिय काम केले आहे. सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी केलेल्या सहकार्यामुळे पतसंस्था फेडरेशनला नुकतेच शासनाची अधिकृत प्रशिक्षण संस्था म्हणून मान्यता मिळाली आहे.
तसेच फेडरेशनला पूर्ण राज्यात १०१ चे वसूलीचे दाखले देण्याची परवानगी नुकातीचे राज्य शासनाने दिली आहे. ही अहवाल सालातील सर्वात मोठी उपलब्धी आहे. या प्रशिक्षण केंद्रा मुळे भविष्यात शिर्डी हे क्षेत्र सहकाराची पंढरी म्हणूनही ओळखले जाणार आहे, असा विश्वास काका कोयटे यांनी व्यक्त केला.
राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनची ३२ वी वार्षिक सर्व साधारण सभा शिर्डी येथे झाली यावेळी ते बोलत होते. गेल्यावर्षी आलेले कोरोनाचे संकट व त्यामुळे सुरु केलेल्या लॉकडाऊनमुळे राज्यातील एकही पतसंस्था अडचणीत आलेली नाही. राज्यातील पतसंस्थांनी जनतेचा मिळवलेल्या विश्वासाची ही पावती आहे.
या आर्थिक वर्षात अनेक चांगल्या घटना घडल्या आहेत. पतसंस्था फेडरेशनला पूर्ण राज्यात १०१ चे वसूलीचे दाखले देण्याची परवानगी नुकातीचे राज्य शासनाने दिली आहे.
त्यामुळे आता केवळ ३० दिवसात पतसंस्थांना १०१ चे दाखले मिळणार आहे. सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी पतसंस्था फेडरेशनला राज्य शासनाची अधिकृत प्रशिक्षण संस्था म्हणून नुकतीच मान्यता दिली आहे.