मुंबई : भाजप (Bjp) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांना भविष्यात लोक रस्त्यावर फटकावतील असा दावा शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे. ते लडाखमधून (Ladakh) माध्यमांशी संवाद साधत होते.
संजय राऊत म्हणाले की, किरीट सोमय्या आमच्या सहकार्यांवर कुटुंबावर तोंड फाटेपर्यंत बोलतात. माझ्या मुलींच्या नावाने वायनरी फॅक्टरी आहे असा आरोप केला, आम्ही अजून शोधतोय ती आहे कुठे?
मुंबईत (Mumbai) पोहोचल्यानंतर किरीट सोमय्या यांच्या फ्रॉडचं, भ्रष्टाचाराचं एक मोठे प्रकरण उघड करणार आहे. किरीट सोमय्यांची भविष्यात जी प्रकरणं पुढे येतील ती पाहिल्यानंतर रस्त्यावर लोकं त्यांना फटकावल्या शिवाय राहणार नाहीत, असे राऊतांनी म्हटले आहे.
तसेच विरोधी पक्षाचे काम आहे भोंग्या शिवाय बोलत राहणं. भोंगे हे विधायक कामासाठी चालत राहिले पाहिजेत. द्वेष निर्माण करण्यासाठी दंगली निर्माण करण्यासाठी तुमचे भोंगे चालवू नका ही महाराष्ट्राची (Maharashatra) परंपरा नाही. तुम्ही विरोधी पक्षाचे काम उत्तम करत राहा, निवडणुका येतील तेव्हा लोक ठरवतील, असेही ते म्हणाले आहेत.
दरम्यान, राज्यसभेच्या निवडणुकीबाबत बोलताना ते म्हणाले की, अपक्ष लढायचं असेल तर त्यांनी त्यांच्या हिमतीवर लढावं. महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) सहावी जागा लढायची हे एकदा ठरवले आहे. संभाजीराजेंविषयी आमच्या मनात आदर आहे. उद्धवजी त्यांना मानतात.
तुमच्या प्रत्येक आंदोलनात आम्ही पाठिंबा दिला आहे. त्यांनी महाविकास आघाडीत सामील व्हावं. मी उभा आहे अपक्ष आणि मला सगळ्यांनी मत द्या असं राजकारणात होत नाही. आधी स्वतःची मतं किती आहेत ते सांगा.आमच्याकडे मते नसतील तर कुणाकडेच नाहीत. शिवसेनेचा उमेदवार जिंकून आणू, असेही संजय राऊत म्हणाले आहेत.